जे जे मराठी आहे ते ते सर्व आपण जगवले पाहिजे, वाढवले पाहिजे, जोपासले पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे, असंही म्हणाले आहेत.
Eknath Shinde मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेच्या गौरवार्थ कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ गुरुवारी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) व उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit pawar ) हे देखील उपस्थित होते.Eknath Shinde
तसेच यावेळी कौशल्य आणि रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आमदार डॉ.मनिषा कायंदे, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी तसेच साहित्य क्षेत्रातील दिग्गज, नामवंत साहित्यिक, लेखक, प्रेक्षक उपस्थित होते.
यावेळी मराठी भाषा विभाग अंतर्गत २०२४ करिता विं.दा.करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत रावसाहेब रंगराव बोराडे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कन्या प्रेरणा दळवी यांना प्रदान करण्यात आला. नामवंत प्रकाशन संस्थेसाठी २०२४ चा श्री.पु.भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला प्रदान करण्यात आला. डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ हा डॉ.रमेश सिताराम सुर्यवंशी यांना तसेच श्री.मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार २०२४ हा भीमाबाई जोंधळे यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठी भाषेवर प्रेम करणारे जगभरात लोक पसरलेले आहेत. परंतु काही मराठी माणसे एकमेकांना भेटल्यावर उगाच हिंदी, इंग्रजीत बोलतात. त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे मराठीतचं बोललं पाहिजे. जे जे मराठी आहे ते ते सर्व आपण जगवले पाहिजे, वाढवले पाहिजे, जोपासले पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे.
तसेच मराठीचा आग्रह धरणे म्हणजे इतर भाषाचा द्वेष करणे नाही. भाषा ही आपली अस्मिता आहे. भाषा ही आपली ओळख आहे. भाषा आपला अभिमान आहे. भाषा हेच आपले अस्तित्व आहे. काळाच्या ओघात किती तरी भाषा नामशेष झाल्या आहेत. आपली भाषा संपली तर एक दिवस आपलं अस्तित्वच संपेल. त्यामुळे भाषेचे जतन आणि संवर्धनाची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. केवळ जबाबदारीच नाही तर ते प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य असल्याचे मत यावेळी एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App