विशेष प्रतिनिधी
मुंबई : धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद यांचा “शाब्दिक खेळ” देवेंद्र फडणवीस यांनी उलगडला आणीबाणीतला “गेम”!! आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा गांधींचा आणीबाणीतला गेम उलगडून सांगितला. विधानसभेत संविधान गौरव या विषयावरच्या विशेष चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी संविधानाच्या विविध वैशिष्ट्यांचा उल्लेख केलाच, पण त्याचबरोबर आज आविष्कार स्वातंत्र्याच्या नावाने बोंबा मारणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतला.Indira Gandhi incorporated the word secular and socialism in constitution
देवेंद्र फडणवीस म्हणाले :
आज अविष्कार स्वातंत्र्याच्या नावाने आरडाओरडा करणाऱ्या पक्षाच्या लोकांच्या नेत्यांनीच देशावर आणीबाणी लादली होती. जनतेचे मूलभूत हक्क हिरावून घेतले होते. वाटेल त्याला आणि वाटेल तेव्हा जेलमध्ये टाकण्याचा सरकारने स्वतःकडे अधिकार घेतला होता.
माझे वडील आणि माझ्या काकू शोभाताई दोन वर्षे जेलमध्ये होत्या. त्यांचा अपराध काय होता हे त्यांना सांगितलेच नाही. केवळ ते विरोधी पक्षाचे होते म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्याची शिक्षा इंदिराजींच्या सरकारने दिली होती.
इंदिराजींच्या सरकारने 42 वी घटना दुरुस्ती केली. त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटले जायचे. कारण त्या एका घटनादुरुस्तीद्वारे इंदिराजींनी राज्यघटनेत तब्बल 99 बदल केले. सरकारकडे सर्वाधिकार घेतले. जनतेच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली केली.
महत्त्वाचे म्हणजे 42व्या घटनादुरुस्तीतूनच इंदिराजींनी राज्यघटनेच्या सरनाम्यात परस्पर धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द घातले, जे मूळ राज्यघटनेत बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेच नव्हते. कारण बाबासाहेब आंबेडकरांना ही माहिती होते की, या देशाचे मूलभूत स्वरूपच धर्मनिरपेक्ष आहे. या देशातल्या जनतेने कधीच तलवारीच्या जोरावर इतर देशांवर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा धरली नाही, उलट इतर देशातल्या पीडित जनसमुदायाला या देशाने आपल्या देशात सामावून घेतले. कोणालाही धर्माच्या आधारावर प्रताडीत केले नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता हा शब्द लिहिलाच नव्हता, तो इंदिराजींनी सरनाम्यात समाविष्ट केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App