भारत विश्वगुरू होण्याचे स्वप्न येत्या २० वर्षात गाठू शकेल : डॉ. मोहन भागवत यांचा विश्वास

वृत्तसंस्था

पुणे – सर्व प्रकारची साधन संपत्ती उपलब्ध असूनही जगात शांती नाही, म्हणूनच जगाला आज गुरूची आवश्यकता भासते आहे. तो गुरू भारत होऊ शकतो ही जगाची अपेक्षा आहे. त्याची पूर्तता भारत करू शकतो.
यासाठी भारतीयांना आपल्या गुणांचा किमान स्तर निर्माण करून तसे आचरण करावे लागेल. असे केल्यास विश्व गुरूचे स्थान आपण येत्या २० वर्षात गाठू शकू असा विश्र्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला.India’s dream of becoming a world leader will be achieved in the next 20 years.

येथील तुळशीबागवाले कॉलनीत आयोजित सहजीवन व्याख्यानमालेत ते ‘विश्वगुरू भारत’ या विषयवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहजीवन व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी उपस्थित होते. व्याख्यानमालेचे हे २३ वे वर्ष होते. ग्लोबल स्ट्रॅटेजीक पॉलिसी फाऊंडेशनचे डॉ. अनंत भागवत यांनी सरसंघचालक डॉ. भागवत यांचे स्वागत केले.
मागील काही वर्षापासून भारताची गतीने भौतिक प्रगती सुरू आहे, त्याबरोबरच नैतिक प्रगती झाली पाहिजे असे सांगून डॉ. भागवत म्हणाले की, स्वामी विवेकानंदांनी विश्व गुरू भारताचे जे स्वप्न पाहिले ते आपल्याला प्रत्यक्षात आलेले पाहता येईल.

आपल्या देशाने निर्माण केलेले संविधान आणि त्यानुसार आचरण होणे अत्यंत महत्वाचे आहे. संविधानाला धरून प्रामाणिकपणे वाटचाल व्हावी. संविधानाची मार्गदर्शक तत्वे, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य यांचे श्रद्धापूर्वक आचरण केले गेले पाहिजे. या कर्तव्यांची समाजात व घरात देखील चर्चा व्हावी. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

वाहतुकीचे नियम पाळणे, पर्यावरण संरक्षण, पाण्याची बचत, कचरा व्यवस्थापन अशा लहान लहान गोष्टींचे अनुसरण वैयक्तीकरित्या करणे आवश्यक आहे. असेही ते म्हणाले.

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक समरसता, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, स्व चा बोध आणि नागरी कर्तव्य या पंच परिवर्तन सूत्रांवर आधारित कार्यक्रम संघ राबवणा असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपले राष्ट्र परोपकारा करिता निर्माण झाले आहे. परंपरा शाश्वत आहे. आमचेच खरे असे म्हणणारे आम्ही नाही. तसेच आम्ही सर्वाविषयी श्रद्धा ठेवणारे आहोत. पण म्हणून आमच्या देवतांवर आक्रमण करून अरेरावी करून कोणी मतांतरण करणार असेल तर ते चालणार नाही. असेही ते म्हणाले.

रविंद्र खरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.

India’s dream of becoming a world leader will be achieved in the next 20 years.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात