Indian Navy Helicopter : अरबी समुद्रात नौदलाच्या हेलिकॉप्टरचे ‘इमर्जन्सी लँडिंग’; तीन क्रू मेंबर्स थोडक्यात बचावले

Navy halecopter

नौदलाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले; जाणून घ्या नेमकं काय झालं?

प्रतिनिधी

भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टरचे मुंबईच्या किनार्‍याजवळ अरबी समुद्रात ‘इमर्जन्सी लँडिंग’ झाले. या घटनेत तीन क्रू मेंबर्स थोडक्यात बचावले आहेत. नौदलाकडून मिळालेल्या माहितीनुसार अडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर(एएलएच)ने मुंबईतून नियमित उड्डाण घेतले होते. मात्र सुमद्रकिनाऱ्याजवळ ते दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेनंतर तत्काळ शोध आणि बचाव मोहिमेमुळे नौदलाच्या गस्ती जहाजाने तीन क्रू सदस्यांची सुरक्षितपणे सुटका केली. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. Indian Navy Helicopter Emergency Landing of Navy Helicopter in Arabian Sea Indian Navy Helicopter

काय कारण होते?

भारतीय नौदलाने एक निवेदन जारी करून माहिती दिली की, मुंबईहून नियमित उड्डाण मोहिमेवर असलेल्या भारतीय नौदलाच्या एएलएचल मध्ये अचानक विजेची कमतरता आणि उंचीही झपाट्याने कमीकमी होत असल्याचे जाणवले. त्यामुळे पायलटने हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी वॉटर लँडिंग केले. दिलासादायक बाब ही आहे की सर्वजण सुखरूप आहेत.

मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आठ वर्षांत भारताचे दरडोई उत्पन्न झाले दुप्पट!

निवेदनात पुढे म्हटले आहे की, “तीनही एअरक्रू हेलिकॉप्टरमधून सुरक्षितपणे बाहेर पडले आणि आता पुढील बचाव कार्याचा भाग म्हणून नौदलाच्या देखरेखीखाली आहेत. त्यांना नेव्हल हेलिकॉप्टर बेस आयएनएस शिक्रा येथे आणून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

चौकशीचे आदेश –

नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, ज्या हेलिकॉप्टरची चौकशी केली जात आहे ते स्वदेशी ‘ध्रुव’ एएलएच होते. ज्यामध्ये तीन एअरमन नियमित उड्डाण मोहीम राबवत होते.

Indian Navy Helicopter Emergency Landing of Navy Helicopter in Arabian Sea Indian Navy Helicopter

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात