तैलचित्राचे अनावरण : मॉस्कोतील भारतीय दूतावास रंगला अण्णाभाऊ साठेंच्या आठवणीत!!;

प्रतिनिधी

मुंबई : रशियाची राजधानी मॉस्कोच्या स्टेट लायब्ररीच्या प्रांगणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्ध पुतळा विराजमान झाला, त्याचवेळी भारतीय दूतावास देखील अण्णाभाऊंच्या आठवणीत अनोख्या पद्धतीने रंगला होता. निमित्त होते, मॉस्कोतील भारतीय दूतावासात अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाचे!! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण झाले. यावेळी फडणवीस यांनी अण्णाभाऊंच्या अनेक आठवणी सांगितल्या.Indian Embassy in Moscow commemorates Annabhau Sathe

फडणवीस म्हणाले :

आज एकाच दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना दुसर्‍यांदा मानवंदना अर्पित करण्याची संधी मिळाली, याचा अतिशय आनंद आहे. मॉस्कोतील भारतीय दुतावासातील भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सांस्कृतिक केंद्रात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण केले.



 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या घराचा दरवाजा थोडा छोटा होता. लोक त्यांना विचारायचे की इतका लहान दरवाजा का? त्यावर ते गंमतीने उत्तर द्यायचे, पंडित नेहरू जरी आले तरी त्यांना माझ्या घरात वाकून यावे लागेल. आज नेहरु सेंटरमध्ये त्यांच्या तैलचित्र अनावरण झाले, हा विलक्षण योगायोगच आहे.

कोणतीही व्यक्ती जन्माने नाही, तर कर्माने मोठी होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन हे त्याचे मूर्तिमंत आहे. स्वत:चे जीवन प्रताडित असताना सुद्धा त्यांनी इतरांच्या आयुष्यात आनंद फुलविला.

त्यांचे शिक्षण झाले नाही, त्यांना शाळेत जाता आले नाही. पण, आज त्यांच्या साहित्यावर अनेक विद्यार्थी पीएचडी करतात. त्यांची लेखणी इतरांना प्रेरणा देणारी ठरली. लेखणीने परिवर्तन, लेखणीने समाजाला धीर आणि त्याच लेखणीने लढण्याचे बळ असे काम त्यांनी केले.

रशिया प्रवासाचे त्यांनी केलेले वर्णन खर्‍या अर्थाने यथार्थ होते. प्रवास वर्णन हे साधारणत: रंजक असते. पण, त्यातूनही प्रेरणा मिळणे, अशा पद्धतीचे वर्णन त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी अतिशय आभारी आहे की, त्यांच्या पाठिंब्यामुळे आजचे दोन्ही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने झाले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान रशियात झाला.

भारतीय दूतावासातील या कार्यक्रमात महाराष्ट्र विधानसभाध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, मिलिंद कांबळेंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Indian Embassy in Moscow commemorates Annabhau Sathe

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात