विशेष प्रतिनिधी
पुणे: भारत जीडीपीमध्ये लवकरच जपानला मागे टाकेल. भारत आशियातील दुसरी आणि जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे.India will become the world’s third largest economy, believes Reliance chairman Mukesh Ambani
पुणे इंटरनॅशनल सेंटरचा कार्यक्रम आशिया इकॉनॉमिक डॉयलॉग 2022 मधील एका चर्चेत अंबानी यांनी भाग घेतला. यावेळी त्यांना विचारण्यात आले की, येणाऱ्या काळात भारत आणि आशियाची काय परिस्थिती असणार आहे? यावर अंबानी म्हणाले, आशियाने गेल्या दोन शतकांपासून खूपच वाईट काळ पाहिला आहे.
आता आशियाची वेळ आली आहे आणि 21 वं शतक आशियाचे असेल. ग्लोबल इकॉनॉमीचे सेंटर आता आशियामध्ये शिफ्ट झालं आहे. आशियाची जीडीपी ही इतर जगाच्या तुलनेत सर्वांत जास्त झाला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेबाबत बोलताना अंबानी म्हणाले की, भारताचा जीडीपी 2030 पर्यंत जपानपेक्षाही मोठा होईल. यासोबतच भारत अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल. चीनची ग्रोथ स्टोरी जितकी शानदार आहे, तितकीच शानदार भारताची असेल.
अंबानी म्हणाले, भारताने तीन गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. सर्वांत आधी भारताला 10 टक्क्यांहून अधिक ग्रोथ रेटसाठी एनर्जी आऊटपूट वाढवायला हवं. त्यांनी दुसरं काम सांगितलं की, भारताला एनर्जी बास्केटमध्ये क्लीन अँड ग्रीन एनजीर्चे शेअर्स वाढवायला हवेत. तिसरं आणि शेवटचं काम म्हणजे आत्मनिर्भर बनायला हवं. त्यांनी असा विश्वास व्यक्त केलाय की पुढील 10-15 वर्षांत भारताची कोळशावरील अवलंबित्व समाप्त होईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App