विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाच्या संकटात डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे उदगार भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले असून भारत कोरोना लस निर्मितीचे जागतिक केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. India will become the world center of Corona vaccine production : Fadnavis
राज्य मराठी पत्रकार संघ आणि संकल्प संस्थेने डॉक्टर डे निमित्त कोरोना काळात भरीव योगदान देणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्यसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले,आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते.कोरोना काळात डॉक्टर, परिचारिका, पोलिस आणि अन्य लोक आणि संघटनानी केलेल्या कार्याचे कौतुक फडणवीस यांनी केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App