इंदापूर : लासूर्णे येथील मंगल कार्यालयाच्या मालकावर गुन्हा दाखल , लग्नसोहळ्यामध्ये कोरोना नियमांना तुडवले पायदळी

 

लासुर्णे गावच्या हद्दीत निळकंठेश्वर मंगल कार्यालयामध्ये विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.विवाह सोहळ्यामध्ये संयोजकांनी नागरिकांची गर्दी जमवली.Indapur: Owner of Mangal office at Lasurne charged, trampled on corona rules at wedding


विशेष प्रतिनिधी

वालचंदनगर : लासुर्णे (ता.इंदापूर) येथील मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यामध्ये कोरोनाच्या नियम पायदळी तुडवल्याने विवाहसोहळ्याचे संयोजक व मंगल कार्यालयाच्या मालकावर वालचंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.Indapur: Owner of Mangal office at Lasurne charged, trampled on corona rules at wedding

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रविवार (ता.१६) रोजी लासुर्णे गावच्या हद्दीत निळकंठेश्वर मंगल कार्यालयामध्ये विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.विवाह सोहळ्यामध्ये संयोजकांनी नागरिकांची गर्दी जमवली.

तसेच कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी उपाययोजना न करता शासनाचे नियमांकडे दुर्लक्ष करुन जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पाळला नसल्याने गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पोलिसांनी विवाहसोहळ्याचे संयोजक चंद्रकांत काट्याप्पा घोरपडे ( वय ४५ वर्ष रा .वैदवाडी लासुर्णे) व मंगल कार्यालयाचे मालक वेताळ धोंडीबा करे (वय ६५ वर्ष रा . लासुर्णे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पोलिस नाईक विकास दशरथ निर्मळ यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.दरम्यान याप्रकरणी साहय्यक फौजदार उत्तम खाडे तपास करीत आहेत.

Indapur: Owner of Mangal office at Lasurne charged, trampled on corona rules at wedding

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात