गेल्या पाच वर्षांपासून ‘प्रोग्रॅम ऑन एनहान्समेंट ऑफ इमर्जन्सी रिस्पॉन्स’ उपक्रम राबवण्यात येत आहे.Increasing capacity of fire brigade: Ten more mini fire stations will be set up in Mumbai
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आगीच्या दुर्घटनेत होणारी जीवित-वित्तहानी टाळण्यासाठी पालिका आपले अग्निशमन दल अद्ययावत करीत आहे.यामध्ये मिनी फायर स्टेशनची संख्या वाढवण्यात येत आहे.सध्या पालिकेची 35 मोठी फायर स्टेशन आहेत.गेल्या पाच वर्षांपासून ‘प्रोग्रॅम ऑन एनहान्समेंट ऑफ इमर्जन्सी रिस्पॉन्स’ उपक्रम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमात १८ मिनी फायर स्टेशन उभारण्यात आली असून आणखी दहा मिनी फायर स्टेशन उभारण्यात येणार आहे. तसेच आता फायर फायटिंग सिस्टीम असलेल्या बाईक, रोबोट अशी उपकरणे आणली जाणार आहेत ,अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.
पुढे अश्विनी भिडे म्हणाल्या की , मुंबईत घडणाऱ्या आगीच्या दुर्घटनांसह सर्व प्रकारच्या दुर्घटनांमध्ये अग्निशमन दल तातडीने धावून जात बचावकार्य करीत असल्याचे त्या म्हणाल्या मुंबईत वाढलेली बांधकामे आणि दाटीवाटीची वस्ती असल्याने बचावकार्यात अडथळे येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरात आग लागल्यानंतर पीक अवरमध्ये ‘रिस्पॉन्स टाइम’ २० मिनिटे तर उपनगरात ३० मिनिटे आहे. केंद्रीय नियमावलीनुसार हा कालावधी साडेसहा ते साडेसात मिनिटे असायला हवा.म्हणून मुंबईसाठी हे आव्हान ठरत आहे. त्यामुळे ‘प्रोग्रॅम ऑन एनहान्समेंट ऑफ इमर्जन्सी रिस्पॉन्स’ उपक्रमात मिनी फायर स्टेशनची संख्या वाढविण्यात येत आहे असे अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.
मुंबईत लागणाऱ्या एकूण आगीच्या घटनांपैकी ८०%आगी या शॉर्टसर्किटमुळे लागतात. त्यामुळे इमारतींमधील अंतर्गत वायरिंग तपासणी करणे गरजेचे बनले आहे. मात्र पालिकेकडे फक्त फायर ऑडिट करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक ऑडिट करण्यासाठी नियमावली बनवणे आणि कार्यवाही करण्यासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.
१) गोदरेज कॅम्पस किक्रोळी २ )गोराई क्हिलेज, बोरिकली पश्चिम ३)सीटीआयआरसी बोरिकली पूर्क, ४)दहिसर क्हिलेज ५) जुहू तारा रोड, सांताक्रुझ ६) कुर्ला पश्चिम तकिया कॉर्ड ७) हन्सराज भुगरा मार्ग, सांताक्रुझ पूर्क ८) एसएफटीसी कडाळा ट्रक टर्मिनल ९) लोढा फ्लोरेंझ्aाा, पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगाक पूर्क १०) शिकसृष्टी सिग्नल, क्ही.एन. पुरक मार्ग, कुर्ला पूर्क ११) टिळक नगर, चेंबूर, एम-पश्चिम कॉर्ड
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App