भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात साजरी केली जात असताना अमेरिकेच्या सिनेटमध्ये बाबासाहेबांचा गौरव करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. जभरातील युवा नेत्यांना बाबासाहेबांच्या जीवनातून प्रेरणा मिळेल आणि त्यांनी दिलेला समानतेचा मंत्र पाळतील असा विश्वास सिनेटर आरओ खन्ना यांनी व्यक्त केला आहे.In the U.S. Senate Glory to Babasaheb Ambedkar
विशेष प्रतिनिधी
पुणे : भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात साजरी केली जात असताना अमेरिकेच्या सिनेटमध्ये बाबासाहेबांचा गौरव करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
जभरातील युवा नेत्यांना बाबासाहेबांच्या जीवनातून प्रेरणा मिळेल आणि त्यांनी दिलेला समानतेचा मंत्र पाळतील असा विश्वास सिनेटर आरओ खन्ना यांनी व्यक्त केला आहे.भारतीय घटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या माध्यामतून आदरांंजली वाहण्यात आली आहे.
आरओ खन्ना हा प्रस्ताव मांडताना म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी मानवी प्रतिष्ठेचा कायमच आग्रह धरला. अमेरिका आणि भारत हे दोन्ही देश मानवी प्रतिष्ठेला सर्वोच्च मानतात. त्यामुळेच मी डॉ. बाबासाहेब आंबेठकर यांच्या गौरवाचा प्रस्ताव सिनेटमध्ये मांडला.
त्यामुळे जगभरातील युवा नेत्यांना प्रेरणा मिळेल आणि समानतेच्या तत्वासाठी लढण्याची उमेद मिळेल.अमेरिकेत अमेरिकन-अफ्रिकनांबद्दल होत असलेल्या दुजाभावाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसºया वर्षी खन्ना यांनी हा प्रस्ताव मांडला आहे.
या गौरव प्रस्तावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय घटनेसाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांना सलाम करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रस्तावात अस्पृश्यता आणि जातीभेदाच्या विरोधशत डॉ. बाबासाहेबांनी केलेल्या कामाचा गौरव करण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, नागरी अधिकार, धार्मिक सद्भावना या क्षेत्रात केलेल्या कामगिरीचाही गौरव करण्यात आला आहे.समानता, लोकशाही मूल्य, सामाजिक न्याय , लिंगभाव आणि सर्व जातीधर्मांत समानतेची भावना यांचाही उल्लेख प्रस्तावात करण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार कायद्यात सुधारणांसाठी महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्यामुळेच कामगारांचे कामाचे तास बारावरून आठ तास झाले. याचाही गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App