विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारशी संबंधित अकरा जणांवर भाजपाचे नेते किरीट सोमय्या घोटाळा इलेव्हन असा आरोप केला आहे. सोमय्या यांनी ट्विट करत अकरा जणांच्या नावाची यादी दिली आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, परिवहन मंत्री अनिल परब, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ अशा ११ जणांची नावं आहेत.In the Thackeray government, scam XI, Kirit Somaiya accused these leaders of scam
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बांधकाम केले. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वसुली कांडात ईडीने पुरावे दिले. परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट, परिवहन विभागात चौकशी, शिवसेना खासदार भावना गवळी यांनी बँकेचे पैसे लाटले, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी गाळे ढापले,
माजी मंत्री रवींद्र वायकर आणि रश्मी ठाकरेंनी मिळून जमीन घोटाळा केला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची एसआरएचा भूखंड प्रकरणी चौकशी सुरु, छगन भुजबळ यांच्यावर आरोप आहेत. शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये पैसे पाठवले तर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगला बांधला आणि पाडला’ असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App