विशेष प्रतिनिधी
मुंबई : Congress महाविकास आघाडीत जागावाटपात जरी ठाकरे + पवारांनी काँग्रेसला रेटारेटी केली असली, तरी मतदान पूर्व सर्वेक्षणातून काँग्रेसनेच ठाकरे आणि पवारांच्या पक्षावर कुरघोडी केल्याचे चित्र समोर आले आहे. या सर्वेक्षणात काँग्रेसला 68 शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 44 आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 41 जागा मिळतील, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. त्यामुळे जागा वाटपात काँग्रेसला कितीही रेटारेटी केली तरी ठाकरे आणि पवारांना काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळवण्यात यश आलेले दिसत नाही. Congress
त्याचवेळी या सर्वेक्षणामध्ये भाजपला 79 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 23 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 14 जागा मिळतील, असेही भाकीत वर्तविण्यात आले आहे. याचा अर्थ भाजप सलग दोन वेळा ट्रिपल डिजिट मधल्या आमदारांच्या संख्येवरून डबल डिजिट वर येणार असून तरीदेखील तोच पक्ष महाराष्ट्रातला सर्वांत मोठा पक्ष ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने 48 पैकी 31 जागांवर विजय मिळवला. त्यावेळी 181 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला महायुती पेक्षा जास्त मते मिळाली होती. परंतु, लोकसभेतली ही आघाडी महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत टिकवता आलेली दिसत नाही. कारण महाविकास आघाडीच्या जागा 157 भरल्या, तर महायुतीच्या जागा 117 भरत आहेत
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App