उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

 

नाशिक : उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!, असे आज विधान परिषदेत घडले.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची आज विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची मुदत संपली त्यामुळे त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महत्त्वाच्या नेत्यांची भाषणे झाली या सगळ्यांनी अंबादास दानवे यांच्या राजकीय कर्तृत्वाचा विशेषत्वाने उल्लेख केला.

यातल्याच भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सभापतींच्या उजव्या बाजूला येऊन बसण्याची ऑफर दिली. 2029 पर्यंत तरी आम्हाला म्हणजेच भाजप महायुतीला सभापतींच्या डाव्या बाजूला येऊन बसण्याची संधी नाही. त्यामुळे तुम्हालाच हवे असेल, तर तुम्ही सभापतींच्या उजव्या बाजूला येऊन बसू शकता. फक्त त्यासाठी आपल्याला थोडे वेगळे बोलावे लागेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याबरोबर सभागृहात हशा उसळला. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली, अशा बातम्या मराठी माध्यमांमध्ये सुरू झाल्या. त्यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लढविले गेले. कारण देवेंद्र फडणवीस यांचे विधान तसे राजकीयच होते.

– फडणवीस कुणाचा पत्ता कापणार?

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरेंना सत्तेच्या बाकावर येऊन बसण्याची ऑफर दिल्याने त्याचे नेमके काय अर्थ होतात??, फडणवीस उद्धव ठाकरे यांना सत्तेच्या वर्तुळात समाविष्ट करणार, तर मग कुणाचा पत्ता कापणार?, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. फडणवीस यांच्या भाषणावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनेकांनी वेगवेगळ्या अटकळी बांधल्या. त्यामध्ये फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या आयुष्यात पाचर मारून ठेवली, असे बोलले गेले. पण त्या पलीकडे जाऊन फडणवीसांनी उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवल्याचे फारसे कोणी बोलले नाही. ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या चर्चेदरम्यानच उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या बैठकीची पुडी सोडून दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना पण महाविकास आघाडीत सामील करून घेणार आणि तिच्यात ठाकरेंचा टक्का वाढविणार, अशी चर्चा सुरू झाली होती.

– काँग्रेस – राष्ट्रवादी चिंतेत

त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात शंका निर्माण झाली होती. आधीच महाविकास आघाडी डळमळीत झाली. त्यात राज ठाकरेंनी एन्ट्री केली, तर आपल्या वाट्यात घट व्हायची चिंता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटली.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांनाच सत्ताधारी बाकांवर येऊन बसण्याची ऑफर दिल्याने उरली सुरली महाविकास आघाडी आणखी डळमळीत झाली.

In the Maharashtra Assembly, CM Devendra Fadnavis says

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात