• Download App
    Sharad Pawar "ऑपरेशन टायगर" मध्ये म्हणे, शरद पवारांची "एन्ट्री"; प्रत्यक्षात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसण्याची साधणार "संधी"!!

    “ऑपरेशन टायगर” मध्ये म्हणे, शरद पवारांची “एन्ट्री”; प्रत्यक्षात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसण्याची साधणार “संधी”!!

    नाशिक : “ऑपरेशन टायगर” मध्ये म्हणे, शरद पवारांची एन्ट्री; प्रत्यक्षात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसण्याची साधणार “संधी”!!, हेच राजकीय वास्तव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार कुठल्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी दिसून आले.

    “ऑपरेशन टायगर” मध्ये म्हणे, शरद पवारांनी एन्ट्री केली. मराठी माध्यमांनी तशा बातम्या चालविल्या. शरद पवारांनी म्हणे, संजय राऊतांना फोन केला. फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवा. त्यांना मोकळीक देऊ नका, असे म्हणे, शरद पवारांनी संजय राऊत यांना सांगितले. स्वतः संजय राऊत यांनीच अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळेच ऑपरेशन टायगर मध्ये शरद पवारांची “एन्ट्री” झाल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या.

    उद्धव सेना वाचवायचा आव

    म्हणजे जणू काही शरद पवारांनी ऑपरेशन टायगर मध्ये एन्ट्री करून ते ऑपरेशन रोखलेच, त्यांनी फुटणाऱ्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये सभा घ्यायची आश्वासने देऊन उद्धव ठाकरेंची शिवसेना वाचविलीच, असा आव “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांनी आणला. पण प्रत्यक्षात शरद पवारांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसखोरी करायची संधी साधायचा “डाव” खेळल्याचे राजकीय सत्य मराठी माध्यमांनी सांगितलेच नाही.



    प्रत्यक्षात दोन शिवसेनांमध्ये मोठी पाचर

    कारण शरद पवारांनी जरी, संजय राऊतांना फोन करून फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवा, असे सांगून दोन शिवसेनांमध्ये जास्तच पाचर मारून ठेवली. मूळात शरद पवारांनी ज्या फुटणाऱ्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन सभा घ्यायच्या बाता मारल्या. ते सगळे मतदारसंघ फुटलेल्या आणि न फुटलेल्या शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. ते मतदारसंघ संबंधित खासदारांनी शिवसेनेच्या भगव्याखाली पूर्णपणे बांधून ठेवलेत. बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अखंड शिवसेना असल्यापासून ते शिवसेनेच्या भगव्याचेच बालेकिल्ले राहिलेत. शिवसेना फुटल्यानंतर तिथे दोन शिवसेनेच्या उमेदवारांमध्येच लढती झाल्या आणि त्या लढतीमध्ये शिंदेंची शिवसेना जिंकून आली म्हणजेच फुटलेल्या ६ खासदारांपैकी सहाही मतदारसंघांत शिवसेना हीच सर्वांत मोठी राजकीय शक्ती राहिली. त्या मतदारसंघांमध्ये बाकी कुठल्याही पक्षाला वाढायची संधीच कधी मिळाली नाही. मग जिथे भाजप, काँग्रेस अशा बड्या पक्षांची डाळ शिजली नाही, तिथे शरद पवारांची अखंड किंवा फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही खिजगणतीत सुद्धा नव्हती.

    पवारांना दिसली घुसखोरी करायची “संधी”

    पण आता दोन शिवसेनांमध्ये जबरदस्त आणि तडाखेबंद भांडण लागल्यानंतर शरद पवारांना तिथे राजकीय घुसखोरी करून स्वतःच्या राष्ट्रवादीची संघटना वाढायची “संधी” दिसली. दोन बोक्यांचे भांडण लागले आहे ना, मग आपण त्यातले लोणी खाऊ, असा शरद पवारांचा होरा दिसून आला. म्हणूनच त्यांनी संजय राऊत यांना फोन करून फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवा. त्यांना मोकळीक देऊ नका त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी सभा घेतो, असे सांगितले. पण शरद पवारांनी प्रत्यक्षात शिवसेनेने घट्ट बांधलेल्या बालेकिल्ल्यांमध्येच घुसखोरी करायची “संधी” साधायचा “डाव” खेळला. त्या पलीकडे शरद पवारांचा संजय राऊतांना फोन करण्याचा दुसरा कुठलाही इरादा नव्हता.

    In Operation Tiger Sharad Pawar entry

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    1991 मध्ये शिवसेना फोडणाऱ्या शरद पवारांचा 2026 मध्ये संजय राऊतांना फोन; म्हणाले, फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवा, मोकळीक देऊ नका!!

    Gen Z : ‘जेन झी’ तरुणांवर संघाचा पूर्ण विश्वास; लोकसंख्येच्या असंतुलनामुळेच 1947 मध्ये फाळणी, सध्या लोकसंख्या संतुलनाची गरज!!

    Bhaskar Jadhav : ‘डरो मत… जे होणार ते होणारच’:6 खासदारांच्या बंडानंतर भास्कर जाधवांचा उद्धव ठाकरेंना सल्ला, भाजपवरही घणाघात