• Download App
    Rohit Pawar MPSC पेपरफुटी की फेरपरीक्षेचा बनाव? आधी ई-मेलवरून आरोप, आता तक्रारच बनावट असल्याचा दावा

    Rohit Pawar : MPSC पेपरफुटी की फेरपरीक्षेचा बनाव? आधी ई-मेलवरून आरोप, आता तक्रारच बनावट असल्याचा दावा

    Rohit Pawar

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :Rohit Pawar   MPSCच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या आरोपांना आता नवे वळण मिळाले आहे. भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी तक्रार करणाऱ्या व्यक्तीनेच ती तक्रार बनावट असल्याचा दावा ई-मेलद्वारे केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सत्यता नेमकी काय, याबाबत चर्चा सुरू झाली असून अंतिम निष्कर्ष चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवारांनी आपल्या पोस्टमधून तक्रारदाराच्या खुलाशावर आक्षेप घेतले आहेत.Rohit Pawar

    “पुन्हा लवकर परीक्षा होणार नाही, याच भीतीने फेरपरीक्षेसाठी हा बनाव रचला होता,” असे या नव्या ई-मेलमध्ये म्हटले आहे. मात्र, तक्रारदाराच्या या अचानक घेतलेल्या यू-टर्नवर आमदार रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला असून, यामागे ‘दबावतंत्र’ असण्याची शक्यता वर्तवत सखोल चौकशीची मागणी कायम ठेवली आहे.Rohit Pawar



    मात्र, या कथित ‘यू-टर्न’वर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे आमदार रोहित पवार यांनी गंभीर संशय व्यक्त करत तक्रारदारावर दबाव आणल्याचा आरोप केला आहे.

    रोहित पवारांचा ‘दबावतंत्रा’चा आरोप

    रोहित पवार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीबाबत बनावट तक्रार असल्याचे जे पत्र आयोगातील ‘सूत्रांच्या’ हवाल्याने व्हायरल करण्यात आले आहे, त्यातच अनेक गंभीर विसंगती आहेत.

    त्यांनी काही प्रश्न उपस्थित करत म्हटले की, जर तक्रार केवळ “चेष्टेने” करण्यात आली होती, तर आयोगाने त्याची चौकशी का केली? तसेच, संबंधित प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीजची होती असे सांगितले जात असेल, तर ती कोणती टेस्ट सिरीज होती आणि त्यातील प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत कसे आले, याचे उत्तर देणे आवश्यक आहे.

    रोहित पवार यांनी पुढे असा दावाही केला की, कथित माघारपत्रावरील नाव आणि सहीमध्येही तफावत दिसत आहे. विद्यार्थ्याला दबाव टाकून किंवा धमकावून हे पत्र लिहून घेतल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी म्हटले.

    रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रमुख प्रश्न

    रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढील मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

    “आयोगाचा पेपर असल्याचे चेष्टेने म्हटलं” असे असेल, तर स्क्रीनशॉट खरे असल्याचेच त्यातून सूचित होत नाही का?
    जर पेपर MPSC चा नव्हता, तर आयोगाने त्याची चौकशी करण्याची गरज का भासली?
    प्रश्न टेस्ट सिरीजचे होते, तर ती टेस्ट सिरीज नेमकी कोणती होती?
    २० मार्चच्या कथित संदेशांचा आणि २२ मार्चच्या परीक्षेचा उल्लेख पत्रात ज्या पद्धतीने आहे, त्यात विसंगती का आहे?
    आधीच्या आणि नंतरच्या पत्रातील नाव व स्वाक्षरी वेगवेगळी कशी?
    “दबाव टाकून विद्यार्थ्यांकडून पत्र लिहून घेतले तरी सत्य लपवता येत नाही. ते लपवण्याचा प्रयत्न झाला की अधिक चुका होतात आणि सत्य अधिक स्पष्टपणे समोर येते,” असा दावा रोहित पवार यांनी केला.
    नेमकं प्रकरण काय?

    MPSC मार्फत औषध निरीक्षक पदासाठी २२ मार्च २०२६ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर १२ जून रोजी निकाल जाहीर झाला, जुलैमध्ये मुलाखती पार पडल्या आणि २२ जुलै रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली.

    मात्र, अंतिम निवड यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयोगाला एका निनावी ई-मेलद्वारे तक्रार प्राप्त झाली. परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचा आणि गुणांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप या ई-मेलमध्ये करण्यात आला होता.

    MPSCची चौकशी सुरू

    तक्रार मिळाल्यानंतर आयोगाने संबंधित तक्रारदाराकडे डिजिटल पुरावे मागवले. तसेच तक्रारदार आणि संशयित उमेदवारांना प्रत्यक्ष चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. आयोगाकडून संबंधितांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

    MPSC Drug Inspector Exam Paper Leak Controversy: Fake Complaint Claim and Rohit Pawar’s Reaction

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bombay High Court : “मतं मागता आणि निवडून आल्यावर लोकांचीच डोकी फोडता?”:मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेंना फटकारले, वकिलांनाही सुनावले

    Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार? खासदार सुनील तटकरेंनी दिले स्पष्टीकरण

    Chhagan Bhujbal : धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता; पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर