• Download App
    Kumbh Mela कुंभमेळा हा सामाजिक एकत्वाचे माध्यम; कुंभमेळ्यातील जनसहभाग विषयावर महामंथन

    कुंभमेळा हा सामाजिक एकत्वाचे माध्यम; कुंभमेळ्यातील जनसहभाग विषयावर महामंथन

    •  जनसहभागाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
    •  प्रशासकीय अधिकाऱ्यांसह विविध सामाजिक-सांस्कृतिक संघटनांचा सहभाग

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : “कुंभमेळा हा केवळ पर्वणी आणि स्नानापुरता मर्यादित नसून, त्याला व्यापक धार्मिक व सामाजिक भावजागरणाचे अंग आहे. काळानुरूप परिवर्तन आणि सामाजिक एकत्वाची भावना या पर्वणीतून अधिक दृढ होते. त्यामुळे केवळ प्रशासकीय पातळीवर नव्हे, तर समाजाच्या सक्रिय सहभागातून आगामी कुंभमेळा अधिक प्रभावी आणि यशस्वी करूयात,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी येथे केले.

    आगामी कुंभमेळा अधिकाधिक पर्यावरणपूरक, भाविकांसाठी सुलभ आणि स्थानिक रोजगाराला चालना देणारा ठरावा, या उद्देशाने नाशिक येथील भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कुंभमेळ्यातील जनसहभाग या मुख्य विषयावर या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. या कुंभपर्वामध्ये धार्मिक आयोजनांबरोबरच सामाजिक, आरोग्य, आर्थिक, शैक्षणिक, कला, विज्ञान, सांस्कृतिक आणि जनजाती कल्याण अशा विविध क्षेत्रांतील उपक्रमांच्या नियोजनाबाबत या वेळी मंथन करण्यात आले.

    प्रयागराज येथील कुंभमेळ्यात विविध प्रकारचे यशस्वी कार्यक्रम राबविणाऱ्या प्रमुख संस्था आणि संघटनांचे वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत लिमये यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.



    – विविध संस्थांचा सहभाग

    बैठकीत जनजाती कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सक्षम, शिक्षा संस्कृती उत्थान न्यास, संस्कृत भारती, क्रीडा भारती, संस्कार भारती, धर्म संस्कृती संगम, भारत तिब्बत सहयोग मंच आणि भटके विमुक्त प्रतिष्ठान यांसारख्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी कुंभमेळा स्थानिकांच्या सक्रिय सहकार्याने कसा यशस्वी करता येईल, यावर या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध विधायक मुद्दे मांडले.

    कुंभमेळ्याच्या नियोजनात प्रशासकीय पातळीवर उत्तम समन्वय साधण्यासाठी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री, कुंभ समन्वयक रामेश्वर नाईक उपस्थित होते. तर कुंभमेळ्यादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्याच्या दृष्टीने पोलीस महानिरीक्षक संजय एनपुरे, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी आणि नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही या बैठकीला उपस्थित राहून प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला.

    Kumbh Mela is a medium of social unity

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Bawankule  : महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा; बचत गटांना मिळणार 1 हेक्टर जमीन, सोबत 1 लाखांचे अनुदान; बावनकुळेंनी सांगितली नवी योजना

    Dattatray Bharne : ‘अडीच लाखांच्या कर्जातील 50 हजार भरले तर 2 लाख माफ’:कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे मोठे विधान, नेमके काय म्हणाले भरणे?

    Nagpur IAF Officer : एअरफोर्स अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार; धर्मपरिवर्तनाचाही प्रयत्न झाला; व्हिडिओमध्ये रडत म्हणाली- मला सोडून द्या