वृत्तसंस्था
नाशिक : नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक शहर बससेवेत आता महिला वाहकही दिसणार आहेत पहिल्या टप्प्यात २५ महिलांना प्रशिक्षण देऊन १ एप्रिलपासून सेवेत आणले जाणार आहे. तसेच टप्प्याटप्प्याने एकूण १०० महिलांना वाहकपदी नेमणूक देण्यात येणार आहे. in Nashik Soon 100 women in bus service
महापालिकेची महत्त्वाकांक्षी सिटीलिंक शहर बससेवा गेल्या वर्षी ८ जुलैपासून नाशिककरांच्या सेवेत दाखल झाली आहे. गेली दीड वर्ष ही सेवा कोरोनामुळे ठप्प पडली आहे त्यानंतर मात्र बससेवेने गती घेतली असून, नाशिक शहरच नव्हे, तर मनपा हद्दीबाहेर २० किमी अंतरापर्यंत असलेले सिन्नर, पिंपळगाव, दिंडोरी, र्त्यंबक अशा ग्रामीण भागातही महापालिका बससेवा देत असल्याने प्रवाशी संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. सध्या मनपाच्या ताफ्यात २५० हून अधिक बसेस आहेत. तर त्यासाठी प्रत्येकी ५०० वाहक आणि चालकांची नेमणूक करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App