नाशिकमध्ये येऊन पवार इतिहासात रमले, मोदींना आपण कशी, कुठे आणि केव्हा मदत केली??, हे सांगितले!!

विशेष प्रतिनिधी

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत नाशिक मध्ये येऊन शरद पवार इतिहासात रमले नरेंद्र मोदींना आपण कशी, कुठे आणि केव्हा मदत केली??, हे पवारांनी पत्रकारांना सांगितले. In nashik sharad pawar became nostalgic, told journalists how he helped Narendra Modi during UPA regime

यूपीए सरकारच्या काळात सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार केंद्रात कृषिमंत्री होते. नरेंद्र मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरात दंगलींचे कारण पुढे दाखवून अमेरिकेने त्यांचा व्हिसा रद्द केला होता. दरम्यान त्याच काळात योगायोगाने पवार कृषिमंत्री या नात्याने इस्रायलच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी नरेंद्र मोदींनी पवारांना फोन केला आणि आपल्या स्वतःला इस्रायलच्या दौऱ्यावर घेऊन जाण्याची विनंती केली. पवारांनी ती विनंती मान्य केली आणि ते नरेंद्र मोदींना आपल्याबरोबर 4 दिवसांच्या इस्रायल दौऱ्यात घेऊन गेले. पवारांनी इस्रायल मधली शेती नरेंद्र मोदींना दाखवली. तिथल्या शेतीचे प्रगत तंत्रज्ञान दाखवले. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींना शेती आणि बाकीच्या विकासासंदर्भात आस्था होती, असे पवार नाशिकमधल्या पत्रकारांना म्हणाले.

त्यानंतर पवारांनी आपल्या टीकेचा रोख नरेंद्र मोदींवर वेगळ्या पद्धतीने वळविला. मोदींना ते मुख्यमंत्री असताना विकासामध्ये रस होता. परंतु, आता फक्त राजकारण करण्यातच त्यांना रस आहे. ते कुठल्याही विषयावर राजकीय धोरणातूनच टीका करत राहतात, असा आरोप शरद पवारांनी केला. दिंडोरीच्या सभेत नरेंद्र मोदींना ज्या शेतकऱ्याच्या मुलाने कांद्यावर प्रश्न विचारला, त्याचा आपल्याला अभिमान वाटतो, असे शरद पवार म्हणाले. याच शरद पवारांच्या सभेत 2009 मध्ये दिंडोरीच्या शेतकऱ्यांनी कांदे फेकले होते. याची आठवण पवारांनी, “काही राजकीय नेत्यांच्या सभेत दिंडोरीच्या शेतकऱ्यांनी कांदे फेकले होते”, अशा शब्दांमध्ये सांगितली. स्वतःच्याच सभेत शेतकऱ्यांनी कांदे फेकल्याची वस्तुस्थिती मात्र पवारांनी शिताफीने दडविली.

पण लोकसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत पवार आजच्या पत्रकार परिषदेत इतिहासात रमले आणि त्यांनी नरेंद्र मोदींना यूपीए सरकारच्या काळात आपण स्वतः कशी मदत केली, हे सांगितले. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

In nashik sharad pawar became nostalgic, told journalists how he helped Narendra Modi during UPA regime

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात