विशेष प्रतिनिधी
अमरावती : स्वतंत्र विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती व्हावी व कोरोना काळातील संपूर्ण विज बिल सरकारने भरावे, पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ मागे घ्यावी यासाठी विदर्भ राज्य समितीतर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिना पासून नागपूर येथील शहीद चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष व वामनराव चटप यांनी दिली. In Nagpur independent Vidarbha Movement ; will be started on 9 August
अमरावतीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. २०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सत्तेत आल्यावर वेगळा विदर्भ करू, असे आश्वासन दिले होते, असे विदर्भ राज्य समितीचे वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, सत्तेवर आल्यावर विदर्भातील लोकांशी गद्दारी केली, असा आरोप केला. भाजपने वचन पाळलं नाही त्यामुळे ९ ऑगस्ट रोजी बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहोत, असे पत्रकार परिषदेत सांगितले
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App