विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती केली होती. दोन्ही पक्षांनी तिथे एकत्र येऊन निवडणूक लढवली. दोन्ही पक्षांना अपयश आले. पण या अपयशाची जबाबदारी एकत्रित राहून स्वीकारण्याच्या ऐवजी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेसलाच टोमणे मारलेत.
आम्ही मुंबई महानगरपालिका संदर्भात काँग्रेसला सांगितले होते की अल्पसंख्यांक मतदाराला गृहीत धरू नये.जर मुस्लिमांना आपल्या सोबत ठेवायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील, हे आम्ही पाहिलेच सांगितले होते, तरी सुद्धा मुस्लिम मतदारांना सोबत ठेवण्यासाठी काँग्रेसने काहीही प्रयत्न केले नाहीत, असा टोला मुख्य प्रवक्ते तथा राज्य उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना हाणला.
वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसशी युती केली. त्यांच्याबरोबर वाटाघाटी करताना 62 जागा घेतल्या, पण प्रत्यक्षात 46 जागांवरच उमेदवार उभे केले. त्यामुळे ऐन निवडणुकीत काँग्रेसची गोची झाली. काँग्रेसला 18 जागांवर अपक्ष उमेदवारांना पाठिंबा द्यावा लागला किंवा त्यांना पुरस्कृत करावे लागले. या मुद्द्यावरून सुद्धा काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना घेरण्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेसलाच दूषण दिले. आणि आता पराभव झाल्यानंतर सुद्धा वंचितने काँग्रेसच्या नेत्यांच्या बरोबरीने अपयशाची जबाबदारी घेण्याच्या ऐवजी काँग्रेसलाच टोमणे मारलेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App