वृत्तसंस्था
मुंबई : राज्यातील कारागृहांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कारागृह प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्या अंतर्गत विविध कारागृहांत असलेल्या दोन हजार 869 कैद्यांना कोरोनाविरोधी लस देण्यात आली आहे. In maharashtra jail Coronavirus Vaccine drive is taken, Three thousand prisoners got Vaccine
राज्यात 46 कारागृहे आहेत. या कारागृहांमध्ये एकूण 34 हजार 281 कैदी आहेत. त्यापैकी दोन हजार 869 कैद्यांना आतापर्यंत कोरोनाची लस देण्यात आली आहे.
त्यात अंडर ट्रायल दोन हजार 93 आणि शिक्षा झालेल्या 996 कैद्यांचा समावेश आहे. उर्वरित कैद्यांचे देखील लवकरात लवकर लसीकरण करण्यात येणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
येरवडात कारागृहात सर्वाधिक लसीकरण
राज्यातील अन्य कारागृहांच्या तुलनेत पुण्याच्या येरवडा कारागृहात सर्वाधिक म्हणजे 447 कैद्यांना लस दिली आहे. त्यानंतर कोल्हापूर (403), नागपूर (390) कारागृहात सर्वाधिक कैद्यांना लस देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App