ठाकरे – पवार हजर नसलेल्या बैठकीत महाविकास आघाडीचे लोकसभेच्या 48 जागांच्या फॉर्मुल्याबाबत एकमत!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पश्चिम बंगाल आणि पंजाब मध्ये INDI आघाडीत फूट पडली असताना महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या फॉर्म्युल्याबाबत एकमत झाल्याची बातमी समोर आली आहे. पण या बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन नेते उपस्थित नव्हते, ही बाब अधिक अधोरेखित करण्यासारखी घडली आहे!! In a meeting where Thackeray – Pawar was not present, the Mahavikas Aghadi discussed the formula of 48 seats in the Lok Sabha

मुंबईच्या हॉटेल ट्रायडेंट मध्ये झालेल्या बैठकीत काँग्रेस कडून अशोक चव्हाण, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे नेते उपस्थित होते, तर राष्ट्रवादी कडून जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील, तर शिवसेनेकडून संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत हे नेते हजर होते. या सर्व नेत्यांची सकाळी 11.00 वाजता सुरू झालेली चर्चा सायंकाळी 6.30 च्या सुमारास संपली. या मॅरेथॉन बैठकीत महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये महाराष्ट्रातल्या 48 जागांसंदर्भात चर्चा झाली. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांच्या पक्षांना आघाडीत सामावून घेण्यावर एकमत झाले. कोणी कुठल्या जागा लढवायच्या आणि कोणी कुठल्या जागा सोडायच्या यावर दीर्घकाळ चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

पण, सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही नेते उपस्थित नव्हते, तरी देखील बैठकीत एकमत झाल्याचे संजय राऊत म्हणाले. शिवाय आजच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या फॉर्मुल्याबाबत एकमत झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला, तरी तो फॉर्म्युला प्रत्यक्षात जाहीर करण्यात आला नाही. उलट याच फॉर्म्युल्यावर चर्चा करण्यासाठी पुन्हा 30 जानेवारी रोजी बैठक घेण्याचे देखील याच बैठकीत ठरले. त्या दिवशी प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

In a meeting where Thackeray – Pawar was not present, the Mahavikas Aghadi discussed the formula of 48 seats in the Lok Sabha

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात