विशेष प्रतिनिधी
मुंबई : Imtiaz Jaleel ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर एमआयएमच्या (AIMIM) नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या विधानावरून सुरू झालेला राजकीय गदारोळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता या वादात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उडी घेतली असून, त्यांनी सहर शेख यांच्या विधानाचे जोरदार समर्थन केले आहे. “सहर शेख यांचे विधान हे केवळ त्यांचे वैयक्तिक मत नसून ती पक्षाचीच अधिकृत भूमिका आहे,” असे म्हणत जलील यांनी येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्र ‘हिरवा’ करणार,” असे ते म्हणाले.Imtiaz Jaleel
सहर शेख या सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे चांगल्याच चर्चेत आहेत. या वक्तव्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर सहर शेख यांनी माफी देखील मागितल्याचे समोर आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर एआयएमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आज मुंब्य्रात जाऊन नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एआएमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार देखील केला.Imtiaz Jaleel
भगवी शॉल घालून जलील यांची पत्रकार परिषद
इम्तियाज जलील मुंब्र्यात आले असता, कार्यकर्त्यांनी त्यांचे भगव्या रंगाची शॉल घालून स्वागत केले. भगवी शॉल गळ्यात ठेवूनत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. याकडे सर्वांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, “या देशाला रंगांमध्ये वाटले गेले आहे. रंग कोणत्याही एका जातीचा नसतो, पण विशिष्ट मानसिकतेमुळे रंगांना धर्माशी जोडले जाते. आमचा पक्ष सर्वधर्मीयांना सोबत घेऊन चालणारा आहे.”
पोलिसांचा कायदा फक्त आमच्यासाठीच का?
सहर शेख यांना पोलिसांनी दिलेल्या नोटीसवरून जलील यांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजप आमदार नितेश राणे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ प्ले केला. “नितेश राणे जेव्हा मशिदीत घुसून मारण्याची भाषा करतात, तेव्हा त्यांना नोटीस का दिली जात नाही? कायद्याचे निकष फक्त आमच्यासाठीच वेगळे आहेत का? किरीट सोमय्या येतात म्हणून आमच्या नगरसेविकेवर कारवाई होते, हे पोलिसांचे वागणे चुकीचे आहे,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.
किरीट सोमय्यांना थेट इशारा
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मुंब्रा दौऱ्याचा संदर्भ देत इम्तियाज जलील यांनी थेट इशारा दिला. “किरीट सोमय्यांना माझे चॅलेंज आहे की, जर त्यांना वाटत असेल की भाजपची सत्ता आहे म्हणून ते काहीही करतील, तर त्यांनी पुन्हा मुंब्र्यात येऊन दाखवावे. ते पुन्हा आले तर त्यांचे जुने व्हिडिओ मी चौकात लावून लोकांना दाखवेन,” अशा शब्दात त्यांनी इशारा दिला.
“सहर शेख यांचे विधान आता मागे पडले आहे. आता इम्तियाज जलील विधान देऊन जातोय. त्या तोतल्याला सांगून जातोय की, तू एका मुलीविरोधात कारवाई करत होतास, तर आता माझ्याविरोधात काय कारवाई करायची ती कर,” असे थेट आव्हानही इम्तियाज जलील यांनी किरीट सोमय्या यांना दिले.
संविधान वाचवणे हीच आमची प्राथमिकता
भाजप सत्तेत आल्यापासून ‘हिंदू राष्ट्र’ करण्याच्या गप्पा मारत असून हे केवळ सत्तेसाठी सुरू आहे, अशी टीका जलील यांनी केली. त्यांनी भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचीही निंदा केली. “असदुद्दीन ओवेसी यांच्यापेक्षा मोठा घटनातज्ज्ञ नेता या देशात नाही. आम्ही जातीवादी नाही, तर संविधान वाचवण्याची भाषा करणारे लोक आहोत,” असे त्यांनी निक्षून सांगितले.
एमआयएमचे हिंदू उमेदवारही विजयी!
एमआयएमवर होणाऱ्या जातीयवादाच्या आरोपांना उत्तर देताना जलील यांनी पक्षाच्या सर्वसमावेशकतेचा दाखला दिला. “आम्ही नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये १२५ जागा जिंकून मोठी झेप घेतली आहे. आमचे हिंदू बांधव विजय उबाळे आणि मयूर सारंग हे मुस्लिम बहुल भागातून एमआयएमच्या तिकिटावर निवडून आले आहेत. आमच्या १२५ विजयी उमेदवारांपैकी अनेक जण हिंदू आहेत. केवळ पराभवाच्या धास्तीने विरोधक आमच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत,” असा टोलाही त्यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App