Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप- फक्त 4 सेकंदात भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावावर कोट्यवधीची जमीन, जावेद शेखला आयकरची नोटीस

Imtiaz Jaleel

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : Imtiaz Jaleel  खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला आयकर विभागाने 150 कोटींची जमीन भेट मिळाल्या प्रकरणी नोटीस पाठवली आहे. ही जमीन हैदराबादमधील सालारजंग कुटुंबाच्या वारसांनी त्याला हिबानामा (देणगी) स्वरूपात दिल्याचे सांगितले जात आहे. एमआयएम पक्षाचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रकरणात मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप केला आहे. संदिपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर अडीच एकर नाही, तर कोट्यवधींची साडेआठ एकर जमीन हिबानामा करून घेतली आहे. फक्त 4 सेकंदात हा सर्व व्यवहार झाला असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.Imtiaz Jaleel

संदीपान भुमरे यांचे ड्रायव्हर जावेद शेख यांना 150 कोटींच्या जमिनीचा हिबानामा झाल्याच्या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जात आहे. पोलिसांनी जावेद शेख यांची अनेक वेळा विचारपूस केली असून, ते आपल्या आधीच्या जबाबावर ठाम आहेत. दरम्यान, चौकशीत अद्याप ठोस पुरावा मिळालेला नाही, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.



<iframe src=”https://www.facebook.com/plugins/video.php?height=476&href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fimtiaz.jaleel%2Fvideos%2F1082230110033023%2F&show_text=true&width=267&t=0″ width=”267″ height=”591″ style=”border:none;overflow:hidden” scrolling=”no” frameborder=”0″ allowfullscreen=”true” allow=”autoplay; clipboard-write; encrypted-media; picture-in-picture; web-share” allowFullScreen=”true”></iframe>

नेमके काय म्हणाले इम्तियाज जलील?

बोगस नवाबाच्या मदतीने भूमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावे सुमारे साडेआठ एकर जमीन हिबानामा करून देण्यात आली. हा व्यवहार केवळ 500 रुपयांच्या बॉण्डवर करण्यात आला. इतकेच नव्हे, तर सिटी सर्व्हे कार्यालयात पीआर कार्ड मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांनाही हाताशी धरले गेले. ही संपूर्ण प्रक्रिया रातोरात उरकण्यात आली आणि संबंधित जमिनीची कोणतीही रजिस्ट्री न करता थेट मालकी हस्तांतरित करण्यात आली, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला.

4 सेकंदात 6 एकर जागेचा व्यवहार झाला

एकूण जमिनीपैकी अडीच एकर जमिनीची 2023 मध्ये रजिस्ट्री करण्यात आली. यानंतर नमुना नंबर म्हणजे कुणाचे आक्षेप असतील तर ते नोंदवण्यासाठी सिटी सर्व्हे ऑफिसद्वारे नोटीस काढली जाते. दरम्यान, 26 जून 2024 नंतर एका जमिनीची रजिस्ट्री झाली आहे. त्यानंतर सिटी सर्व्हे ऑफिस सर्व्हेअरनी 10 वाजून 54 मिनिटांनी नोटीस काढली, ही नोटीस ऑनलाईन अपलोड केली, त्यानंतर लगेच डाऊनलोडही करण्यात आली. म्हणजेच ही नोटीस 25 मे 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 42 मिनिटाला अपलोड केली आणि काही सेकंदात ती डाऊनलोड केली. तसेच रातोरात पीआर कार्ड दिले, त्यासाठी एका मोठ्या मंत्र्याने फोन करण्यासाठी अधिकाऱ्याला फोन केला. म्हणजे केवळ चार सेकंदात 6 एकर जागेचा व्यवहार झाला, असा तपशील इम्तियाज जलील यांनी कागदपत्रांद्वारे दिला आहे.

ड्रायव्हर जावेद रसूल शेख काय म्हणाले?

आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असतानाच, आता आयकर विभागाने जावेद शेख यांनी नोटीस पाठवली आहे. भूमरे यांचा ड्रायव्हर जावेद शेख मात्र आपल्या जबाबावर ठाम आहे. यावेळी बोलताना शेख म्हणाले की, यात व्यवहार काहीही झालेले नाही. मला काही पैसे मिळाले नाही, मी काही दिले नाही मी काही दोषी नाही. माझे दुर्दैव आहे मी भुमरे साहेबांचा ड्राइव्हर असल्याने यात माझे नाव घेतले जात आहे. पण यात माझा काही संबंध नाही.

Imtiaz Jaleel Alleges Land Scam: Bhumre’s Driver Gets ₹150 Cr Land in 4 Secs

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात