उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची पार पडली बैठक
विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची 83 वी बैठक काल सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी विदर्भातील 4199.72 कोटींच्या 11 प्रकल्पांना सुधारीत प्रशाकीय मान्यता देण्यात आली. Improved administrative approval for 11 projects worth 4 thousand 199 crores in Vidarbha
तत्पूर्वी, महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीतील ठळक मुद्दे –
-एकूण 73 विषयांना मंजूरी. 240.02 कोटींचे 12 दायित्व प्रस्ताव मंजूर.
-8 सिंचन प्रकल्प सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यासाठी 681.68 कोटींचे प्रस्ताव मंजूर.
-सिंचन प्रकल्पांतर्गत विविध कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंमत 3.79 कोटींचे प्रस्ताव मंजूर.
-प्रकल्पाच्या भूसंपादन निवाड्यामधून सुटलेल्या मालमत्तांची मूल्यांकन रक्कम, फळझाडे व वनझाडांचा मोबदला तसेच पुनर्वसन बाधीत कुटुंबांना मोबदल्यातून सुटलेल्या, मालमत्तांचे मोबदला रक्कम 148.48 कोटी मंजूर. एकुण 5273.69 कोटींचे प्रस्ताव मंजूर.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App