state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

state government

गुप्तचर माहितीचे आदानप्रदान, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, आवश्यक खबरदारी यावर चर्चा करण्यात आली


विशेष प्रतिनिधी

मुंबई : state government मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि संरक्षण दल यांच्यामध्ये ‘नागरिक-सैन्य समन्वय’ बैठक संपन्न झाली. या बैठकीत गुप्तचर माहितीचे आदानप्रदान, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि आवश्यक खबरदारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.state government

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदुर’च्या अचूक आणि प्रभावी कामगिरीचे कौतुक करताना त्याला ‘अभूतपूर्व’ असे संबोधून संरक्षण दलाला सॅल्युट करतो, असे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. यापूर्वी येथे झालेले दहशतवादी हल्ले हे आर्थिक पायाभूत रचनेवरचा थेट आघात होते. त्यामुळे अशा संवेदनशील ठिकाणी सायबर सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य सरकार आणि संरक्षण दल यांच्यातील समन्वय अधिक सशक्त करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नियमित संवाद आणि माहितीचे आदानप्रदान व्हावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.



या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, लष्करातर्फे लेफ्टनंट जनरल आणि कर्नल, नौदलातर्फे रिअर अ‍ॅडमिरल आणि कमांडर, वायुदलातर्फे एअर वाईस मार्शल, राज्याच्या मुख्य सचिव, राज्याच्या पोलीस महासंचालक आणि गृह व इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी, रिझर्व्ह बँक, जेएनपीटी, बीपीटी, मुंबई स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, एटीएस आणि होमगार्ड यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Important coordination meeting between the defense forces and the state government

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात