घाटकोपरमध्ये हरित लवादाच्या आरक्षित जागेवर मदरशाचे अवैध बांधकाम

प्रतिनिधी

मुंबई : घाटकोपर (पश्चिम) येथील सुभाषनगर येथे हरित पट्ट्यातील आरक्षित जागेवर मदरशाचे अवैध बांधकाम चालू आहे. २०२० पासून हे अवैध बांधकाम उघडपणे चालू असून स्थानिक भारत सोसायटी रहिवासी संघाने याविरोधात स्थानिक पोलीस ठाणे आणि मुंबई महापालिका यांच्याकडे तक्रार केली आहे. मागील २ वर्षांपासून या अवैध बांधकामाच्या विरोधात सातत्याने तक्रार करूनही पोलीस आणि प्रशासन यांनी याकडे अक्षरश: दुर्लक्ष केले आहे. त्याचा परिणाम म्हणजे सद्य:स्थितीत ३ मजल्यांपर्यंत हे अवैध बांधकाम वाढवण्यात आले आहे. हिंदुस्थान पोस्टने ही बातमी दिली आहे. Illegal construction of Madrasa on land reserved by Green Arbitration in Ghatkopar



मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल  

‘जमालत अहले मदीस’ या संस्थेने हे मरदरशाचे बांधकाम चालू आहे. या बांधकामाच्या विरोधात भारत सोसायटी रहिवासी संघाने डिसेंबर २०२० मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या इमारत विभाग, स्थानिक पोलीस यांच्याकडेही तक्रार केली होती; मात्र या तक्रारीवर तातडीने कारवाई करण्यात आली नाही. याविषयी पुन्हा नोव्हेंबर २०२२ मध्ये भारत सोसायटी रहिवासी संघाने मुंबई महापालिका, तसेच पोलीस उपायुक्त यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मुंबई महापालिकेने ‘जमालत अहले मदीस’ या संस्थेला नोटीस पाठवून अवैध बांधकाम त्वरित हटवण्याचा आदेश दिला आहे. मात्र ‘जमालत अहले मदीस’कडून मुंबई उच्च न्यायालयात कारवाईच्या स्थगितीसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाकडून कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

स्थानिकांचीही तक्रार

भारत सोसायटी रहिवासी संघाकडून पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये सोसायटीच्या आवारात बांधण्यात आलेल्या अवैध मदरशामध्ये पहाटे ५ ते रात्री ९ या वेळेत ५ वेळा अजान दिली जाते. या ठिकाणी नमाजपठण करण्यासाठी अनेकदा अज्ञात व्यक्तींचा वावर असतो. याविषयी चौकशी करण्याची मागणी स्थानिकांनी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रारीद्वारे केली आहे.

Illegal construction of Madrasa on land reserved by Green Arbitration in Ghatkopar

महत्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात