विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या वक्तव्याचा काँग्रेसचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये समाचार घेतला. देशात काँग्रेसचे पानिपत झाले आहे. काँग्रेस पक्ष काही ठिकाणी तग धरून आहे. या मुद्यावर शरद पवार यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हंटले होते की, जमिनी गेल्या असून आता जमिनदाराचा जीर्ण वाडा जसा असतो, अशी काँग्रेसची अवस्था देशात झाली आहे. यावरून काँग्रेस पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठोपाठ बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना उत्तर दिले आहे. If We Survive than we will fight again ; congress leader Balasaheb Thorat told to sharad pawar
कॉग्रेस पक्ष राज्य घटनेच्या मूलभूत तत्वाशी निगडीत असुन पक्षावर सध्या कठिण परिस्थिती आली आहे. ती विचारधारेला आली असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.धर्मांधतेचा व्हायरस देशात पसरला असून कॉग्रेस पुन्हा उभारी घेईल. शरद पवारांनी केलेली मांडणी ही विचारधारेला आलेल्या व्हायरसची असून व्हायरस काढून टाकण्याची जबाबदारी एकटी काँग्रेसची नाही. ती सर्व नागरिकांची आहे. आम्ही हार मानणार नाही लढाई करत राहू, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.
शरद पवारजी हम बचेंगे तो और लढेंगे !
काँग्रेसच्या परिस्थितीवर पवारांच्या वक्तव्यावर टोला
जमीनदारी गेली आता उरल्या हवेलीला उत्तर
धर्मांधतेचा व्हायरस देशात पसरला : थोरात
व्हायरस काढून टाकण्याची जबाबदारी सर्वांचीच
आम्ही हार मानणार नाही लढाई करत राहणारच
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App