“उद्धव ठाकरे पत्नीच्या नावाने घोटाळे करत असतील तर त्यांना जनता जाब विचारणार!,” किरीट सोमय्या यांची टीका

कालच्या भाषणात बोलताना ठाकरे यांनी सोमय्या यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत असं वक्तव्य केलं की कोणाच्याही बायका-मुलांवर आरोप करणं हा अक्करमाशीपणा आहे.”If Uddhav Thackeray is committing scams in the name of his wife, people will ask him to answer!”


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा काल मुंबईत पार पडला. या मेळाव्यादरम्यान बोलत असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलीच फटकेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला.आता या भाषणावर टीकासत्र सुरू झालं आहे. आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता किरीट सोमय्या यांनीही या भाषणातल्या काही मुद्द्यांवर टीका केली आहे.

कालच्या भाषणात बोलताना ठाकरे यांनी सोमय्या यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत असं वक्तव्य केलं की कोणाच्याही बायका-मुलांवर आरोप करणं हा अक्करमाशीपणा आहे. यावरच आता सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



यावेळी ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना सोमय्या म्हणाले, “मी ठाकरेंच्या विधानाशी एकदम सहमत आहे. कोणीही खोटे आरोप केलेले योग्य नाही. पण जर उद्धव ठाकरे आपल्या बायकोच्या रश्मी उद्धव ठाकरेंच्या नावाने घोटाळा करत असेल तर साडेबारा कोटी जनता जाब विचारणार. मुख्यमंत्री लुटमार करतात. उपमुख्यमंत्री तर..अरे बापरे! अजित पवारांनी विधान केलं होतं, माझ्या बहिणीच्या घरी का इनकम टॅक्सवाले गेले? किरीट सोमय्यांनी सगळी कागदपत्रं ठेवली ना? तर बायकोच्या नावाने, बहिणीच्या नावाने बेनामी व्यवहार करणं हे त्याहीपेक्षा मोठं पाप आहे. मग तो मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो!

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा मुलगा त्या बिल्डरसोबत संचालक होता, किरीट सोमय्याने कागदपत्रं ठेवली ना? मग का पार्टनरशीप मागे घेतली? म्हणून महापालिकेच्या माफिया कॉन्ट्रॅकरकडून पार्टनरशीपचा मिळालेला पैसा बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणार असाल तर त्याचा जाब मुख्यमंत्र्यांना द्यावा लागणार”.
सोमय्या यांनी पवार कुटुंबावरही टीका केली आहे.

ते म्हणाले, “अजित पवार, सुनेत्रा पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, रोहित पवार आणि आता त्यांना ठाकरे सरकारमध्ये एक नवीन माफिया साथीदार सापडला आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे. आता हे पहिला हल्ला सुरू करणार सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स सगळ्यांना टार्गेट करणार, आमच्या बायका-मुलांवर कारवाई होतेय, मोदी घडवून आणतायत हे सगळं बोलणार. त्यावेळी समाजातले कार्यकर्ते जे ह्यांचेच पीआर यंत्रणा आहेत तेही आपलं काम सुरू करणार. पण राज्याच्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांमध्येही काही चांगले अधिकारी आहेत. आणि न्यायालयही साडेबारा कोटी जनतेच्या बाजूने उभे राहणार”.

“If Uddhav Thackeray is committing scams in the name of his wife, people will ask him to answer!”

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात