कठीण परिस्थितीत धीर देण्याचं सोडून कर्मचाऱ्यांना मीडियाद्वारे धमकी देण्याचा प्रकार राज्य सरकारकडून चालू आहे.If ST employees take the path of suicide due to Nizamshahi then Thackeray government will be responsible for it – MLA Gopichand Padalkar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एसटी कामगारांचा संप चिघळला असून त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.दरम्यान राज्यातील एसटी बस कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
कठीण परिस्थितीत धीर देण्याचं सोडून कर्मचाऱ्यांना मीडियाद्वारे धमकी देण्याचा प्रकार राज्य सरकारकडून चालू आहे.तसेच लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात जर मंत्री अनिल परब यांच्या निजामशाही मुळे कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याची जबाबदारी ठाकरे सरकारची राहील, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.
गोपीचंद पडळकर यांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही सहन करणार नाही ; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सरकारला सूचक इशारा
गोपीचंद पडळकर म्हणाले, “जागोजागी व गावोगावी पोलीस बळाचा वापर करून मंत्रालयाच्या दिशेने निघालेल्या कर्मचाऱ्यांना रोखले जाते आहे. यावरून सिद्ध होते की शांततेत लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात अनिल परबांना उद्रेक घडवायचा आहे. जेणेकरून व पोलिसांच्या लाठ्या-काठ्यांचा वापर हतबल कर्मचाऱ्यांवर करण्याची मोकळीकच अनिल परबांना मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App