प्रतिनिधी
मुंबई : सचिन तेंडुलकर महान क्रिकेटपटू आहे, पण सचिनला स्टेडियम बांधायचे काम दिले तर ते त्याला जमणार नाही. ते काम आमचे आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पाठिंबा दिल्याचे त्यांनी समर्थन केले आहे. If Sachin is given the task of building a stadium, he will not be able to do it, that is our task
इतकेच नव्हे तर क्रिकेट सारख्या खेळात आम्ही राजकारण आणत नाही, असा दावा शरद पवारांनी केला आहे. यासाठी त्यांनी स्वतःचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरुण जेटलींचे उदाहरण दिले आहे. आपण स्वतः बीसीसीआयचे अध्यक्ष असताना नरेंद्र मोदी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. अरुण जेटली दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. आम्ही एकत्र काम केले. या खेळात आम्ही राजकारण आणले नाही, असा दावा शरद पवारांनी केला आहे.
मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो, तेव्हा गुजरातचे प्रतिनिधी नरेंद्र मोदी होते. मोदी माझ्या बैठकीला हजर होते. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा अरुण जेटली दिल्लीचे तर सध्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशचे अध्यक्ष होते. आम्ही सर्वांनी तेव्हा एकत्र काम केले. तेव्हा लोकांना ते लक्षातही आले नाही. पण यावेळी त्याची चर्चा सुरू झाली, असे शरद पवारांनी यावेळी सांगितले.
खेळाडूंना प्रोत्साहित देणे, खेळाडूंना सुविधा पुरवणे हे काम आमचे आहे. त्यांच्या खेळात आम्ही कधी पडत नाही. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर यांच्यासारखे उभे आयुष्य क्रिकेटला योगदान दिलेल्या लोकांच्या ज्ञानाचा उपयोग नवीन खेळाडू निवडणे आणि त्यांना तयार करणे यासाठी व्हायला हवा. ते काम त्यांचे आहे. त्यांना उद्या स्टेडियम बांधायचे काम दिले तर ते त्यांना जमणार नाही. ते काम आमचे आहे. कोणते खेळाडू निवडायचे हे काम त्यांचे आहे, असे शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App