प्रणिती शिंदे जर ज्येष्ठ भगिनी, तर सुशीलकुमार शिंदे रोहित पवारांचे कोण??; त्यांच्या मतदारसंघावर दावा कसा ठोकला??

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशील कुमार शिंदे यांचा दोनदा पराभव झाल्याचा दावा करून राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार रोहित पवारांच्या करवी त्या मतदारसंघावर दावा ठोकला खरा, पण सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्याकडून तिखट प्रत्युत्तर आल्यानंतर मात्र रोहित पवारांना त्या ज्येष्ठ भगिनी असल्याचा साक्षात्कार झाला. आता जर प्रणिती शिंदे या रोहित पवारांच्या ज्येष्ठ भगिनी आहेत, तर मग त्यांचे पिताजी सुशीलकुमार शिंदे हे रोहित पवारांचे कोण??, असा प्रश्न तयार होणे स्वाभाविक आहे. If praneeti shinde is rohit Pawar’s older sister, then how he claimed his “grandfatherlike” sushilkumar shinde’s solapur loksabha constituency??

सुशील कुमार शिंदे हे थेट रोहित पवारांचे आजोबा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पिढीतले राजकीय नेते आहेत. ते केंद्रीय गृहमंत्री राहिले आहेत. इतकेच नाही, तर काँग्रेसने त्यांना थेट उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यासाठी अधिकृत उमेदवारीचे तिकीट दिले होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये सुशीलकुमार यांची ज्येष्ठता फार वरच्या स्तरावरची आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे या जर रोहित पवारांच्या ज्येष्ठ भगिनी असतील, तर सुशीलकुमार शिंदे हे आपले आजोबाच आहेत, हे रोहित पवारांना सोलापूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा ठोकताना समजले नव्हते का?? हा खरा प्रश्न आहे.



पण मुद्दा त्या पलिकडचा देखील आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपला पाया विस्तारताना काँग्रेसचाच राजकीय पाया भुसभुशीत करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे अनेक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ एखाद्या निवडणुकीसाठी मागून नंतर ते कायमचे राष्ट्रवादीचे झाल्याचा अनुभव आहे. राजकीय तडजोडीत अशा प्रकारचे मतदारसंघ एकमेकांना देण्याची पद्धत जरूर आहे. पण राष्ट्रवादीने काँग्रेसला दिलेला मतदारसंघ असे उदाहरण क्वचितच सापडेल.

रोहित पवारांनी सुरुवातीला सोलापूर लोकसभा मतदारसंघावर जरूर दावा ठोकला. पण प्रणिती शिंदे यांच्याकडून, कोण रोहित पवार? मी ओळखत नाही. हं ते पहिल्यांदाच आमदार झालेत. त्यामुळे थोडा फोरकटपणा असतो पण नंतर मॅच्युरिटी येईल, असे तिखट प्रत्युत्तर दिल्यानंतर रोहित पवारांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. प्रणिती शिंदे या आपल्या ज्येष्ठ भगिनी आहेत. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. आपण आपापसात वाद करण्यापेक्षा बेरोजगारी सारख्या प्रश्नावर आपली ताकद एकवटून लढा द्यायला पाहिजे, असे ट्विट रोहित पवारांनी केले आहे.

पण म्हणूनच हा प्रश्न तयार झाला आहे की प्रणिती शिंदे या जर आपल्या ज्येष्ठ भगिनी असल्याचा साक्षात्कार रोहित पवारांना प्रणिती शिंदे यांच्या तिखट प्रत्युत्तर नंतर झाला असेल, तर सोलापूर मतदारसंघावर दावा ठोकताना आपण आपल्या आजोबांच्या वयाच्या सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या मतदारसंघावर दावा करत आहोत हे रोहित पवारांच्या लक्षात आले नाही का??… प्रणिती शिंदे यांच्याकडून प्रत्युत्तर आल्यानंतर भले रोहित पवारांनी वादावर पडदा टाकायचा प्रयत्न केला असेल पण राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापूर लोकसभा मतदारसंघातला ठोकलेला दावा मागे घेतला आहे का??, हा खरा प्रश्न आहे सोलापूर मधली पोस्टर्स बघितली तर त्याविषयी फार मोठी शंका आहे. राष्ट्रवादीच्या पुढच्या भूमिकेत कदाचित त्याचे उत्तर दडले असेल.

If praneeti shinde is rohit Pawar’s older sister, then how he claimed his “grandfatherlike” sushilkumar shinde’s solapur loksabha constituency??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात