या प्रकरणी एसआयटी स्थापन करुन चौकशी करण्यात येणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.If people like Aditya Thackeray are receiving threatening phone calls, they should be taken seriously – MP Imtiaz Jalil
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी एका आरोपीला बंगळुरू येथून अटक करण्यात आली. या प्रकरणी एसआयटी स्थापन करुन चौकशी करण्यात येणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.
दरम्यान या प्रकरणी एआयएमआयएम चे खासदार इम्तियाझ जलील म्हणाले की , नरेंद्र दाभोलकरां सारखे माणसं 100 वर्षांतून तयार होतात. त्यामुळे मंत्री आदित्य ठाकरें सारख्यांना धमकीचे फोन येत असतील तर त्याला गांभीर्यानं घ्यायला हवं, कोणी असं करत असेल, त्यावर कारवाई व्हावी, सर्व राजकीय पक्षांनी यासाठी एकत्र यावं.असं एआयएमआयएम चे खासदार इम्तियाझ जलील यांनी म्हटलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App