हसन मुश्रीफ यांनी काही केलं नसेल तर त्यांना तपास यंत्रणांची भीती का वाटतेय?- भाजपा

‘’मोदींच्या शासनात कोणत्याही भ्रष्टाचाराला थारा नाही.’’, असंही केशव उपाध्ये म्हणाले आहेत.

प्रतिनिधी

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे माजीमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज सकाळीच ईडीचे छापे पडले आहेत. संताजीराव घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्या बाबत गेले दीड महिन्यातली ही त्यांच्या घरावरची तिसरी छापे कारवाई आहे. त्याच वेळी हसन मुश्रीफ यांचे समर्थक पुन्हा एकदा त्यांच्या घरासमोर जमून शक्तिप्रदर्शन करत आहेत. यावरून भाजपाने हसन मुश्रीफांवर निशाणा साधला आहे. If Hasan Mushrif has not done anything why are they afraid of the investigation agencies BJP

‘’हसन मुश्रीफ यांनी काही केलं नसेल तर त्यांना तपास यंत्रणांची भीती का वाटतेय? बेकायदा कर्जवाटप आणि कारखान्यात काही घोटाळा झाला नसेल तर त्यांनी निश्चिंत राहावं. पण तक्रार आल्यावर तपास करणे हे त्या यंत्रणांचे काम आहे. मोदींच्या शासनात कोणत्याही भ्रष्टाचाराला थारा नाही हे नक्की.’’ असं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.


मुश्रीफ – के. कवितांचे शक्तिप्रदर्शन; पण ईडी पुढे शक्तिप्रदर्शन करून विरोधकांचे काय साध्य होणार??


या छापेमारीमुळे कागलमध्ये तणाव निर्माण झाला आहे.  मुश्रीफ यांच्या पत्नीने गोळ्या घाला अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर घरासमोर जमलेल्या एका कार्यकर्त्याने  आपलं डोकं आपटून घेतलं आहे. त्यामुळे कागलमध्ये कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.  यापूर्वी ११ जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील नातेवाईकांच्या निवासस्थानी तसेच गणेशखिंड रस्त्यावरील एका कार्यालयात इडीच्या पथकाने छापा टाकला होता.

कोल्हापुरातील साखर कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या व्यवहारात काळा पैसा गुंतविण्यात आल्याचेही ते म्हणाले होते. तसेच मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांनी साखर कारखाना खरेदी केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर ईडीकडून मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील मालमत्तांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली होती.

If Hasan Mushrif has not done anything why are they afraid of the investigation agencies- BJP

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात