गुजराती आणि राजस्थानी हटवले तर मुंबई आर्थिक राजधानी नाही उरणार; राज्यपालांच्या वक्तव्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड

प्रतिनिधी

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुंबई-ठाणे या शहरांतून गुजराती, राजस्थानींना काढून टाकले तर मुंबईकडे पैसेच उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले आहे. त्यामुळे राज्यपालांच्या या विधानावरुन नवा वाद निर्माण झाला असून महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांनी त्यावर टीकेची झोड उठवली आहे. राज्यपालांचे हे विधान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे राज्यपालांना नारळ देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने देखील राज्यपालांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून मनसेनेही राज्यपदांनी नको त्या गोष्टींना खुपसू असे टीकास्त्र सोडले आहे.If Gujarati and Rajasthani are removed, then Mumbai will not be a financial capital



साधा निषेध तरी करा …

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात भाजप पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरु झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे, असे राऊतांनी म्हटले आहे.

काय म्हणाले राज्यपाल?

भारत देश हा शूरवीरांच्या बलिदानामुळे तसेच दानशूर लोकांच्या दातृत्वामुळे मोठा आहे, असे सांगताना त्याग, बलिदान व सेवा यामुळेच जनतेचे प्रेम मिळते आणि म्हणून सर्वांनी समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषत: मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी- गुजराती समाजांचे योगदान आहे. राज्यस्थानी आणि गुजराती यांना बाहेर काढले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही. गुजराती, राजस्थानी- मारवाडी समाजाने व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालये, इस्पितळे बांधली आणि गोरगरिबांची सेवा केली. राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच, नेपाळ, माॅरिशस आदी देशांमध्येदेखील आहे, असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तिथे तो आपला स्वभाव व दातृत्त्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरुप होतो, असे राज्यपाल म्हणाले.

If Gujarati and Rajasthani are removed, then Mumbai will not be a financial capital

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात