प्रतिनिधी
नागपूर : पोस्टर वरचे मुख्यमंत्री आले लाडू वर, निवडणुकीच्या आधीच नाना बसले खुर्चीवर!!, असे आज 5 जून रोजी घडले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदियातील कार्यकर्त्यांनी त्यांची लाडू तुला केली होती. या लाडूंवर नानांचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून लिहिले होते. नंतर हे लाडू तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना जोरदार घोषणाबाजीत वाटण्यात आले. कार्यकर्त्यांनी आपले नाव भावी मुख्यमंत्री म्हणून लाडू वर लिहिले म्हणून नानाही खुश झाले होते. I will be the Chief Minister, Nana patole spoke to herself
आज 7 ऑगस्ट रोजी नानांनी आपल्या मनातली ती भावना पुन्हा एकदा बोलून दाखवली. कार्यकर्त्यांच्या मनात असेल तर मी मुख्यमंत्री होईन. कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण व्हावी असे मला वाटते, असे वक्तव्य नानांनी टेम्पल रन नंतर केले. नानांनी घृष्णेश्वर मंदिराला भेट देऊन तिथे दर्शन घेतले. भद्रा मारुतीचे दर्शन घेतले आणि खुलताबाद मध्ये जरी दर्ग्याचे दर्शन घेऊन चादर चढवली. त्यानंतर बोलताना नानांनी मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा उघडपणे बोलून दाखवली. कार्यकर्त्यांच्या मनात असेल तर मी मुख्यमंत्री देखील होईन. ती त्यांची इच्छा पूर्ण व्हावी, अशा शब्दांत नानांनी आपले मन मोकळे केले.
तसेही भावी मुख्यमंत्री म्हणून नानांचे नाव काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आधीच भंडाऱ्यातल्या पोस्टरवर झळकवले होतेच. त्यात आता भर पडून गोंदियातल्या कार्यकर्त्यांनी नानांचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून लाडू वर लिहिले.
आता तर नानांनी स्वतःच्या मनातील महत्त्वाकांक्षा उघड बोलून दाखवली. त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App