देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं म्हणजेच मुन्ना यादवला फडणवीसांनी बांधकाम कामगार मंडळावर अध्यक्ष केलं , असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.”I have some political crimes against me, which means I am not a goon” – Munna Yadav
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं म्हणजेच मुन्ना यादवला फडणवीसांनी बांधकाम कामगार मंडळावर अध्यक्ष केलं , असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.
नवाब मलिक यांच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना भाजपचे मुन्ना यादव म्हणले की , “मी गेल्या 25 वर्षांपासून राजकारणात आहे. भाजपचा 10 वर्षे नगरसेवक होतो. त्यामुळं माझ्यावर काही राजकीय गुन्हे आहेत. याचा अर्थ मी काही गुंड नाही.”
पुढे मुन्ना यादव म्हणाले की , देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मला बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष केले. कारण मी बऱ्याच वर्षांपासून राजकारणात आहे. माझ्यावर असलेले गुन्हे हे राजकीय आहेत. निवडणुकीच्या वादातून हे गुन्हे विरोधकांनी माझ्याविरोधात दाखल केले आहेत. आंदोलन करीत असताना जस सगळ्यांवर राजकीय गुन्हे दाखल होतात तसेच राजकीय गुन्हे माझ्यावर आहेत.परंतु माझ्याविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे नाहीत. याप्रकरणी आधीच माझी चौकशी झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App