विशेष प्रतिनिधी
पुणे : भ्रष्टाचार किंवा कोणत्याही गुन्ह्याच्या चौकशीचे अधिकार ज्यांना आहेत, असे विभाग त्यांना काही चुकीचे वाटले, तर चौकशीसाठी बोलवत असतात. यापूर्वी मलाही अँटीकरप्शन ब्युरो (एसीबी) तसेच इतर विभागांनी चौकशीसाठी बोलवले होते. मी तिथे गेलो होतो. अधिकाऱ्यांनी माझी 5 तास चौकशी केली. पण मी त्याचा कधी प्रपोगंडा किंवा त्याचा इव्हेंट केला नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काका शरद पवार आणि पुतणे आमदार रोहित पवार यांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांना लगावला आहे. I have never done inquiry propaganda or events – ajit pawar
बारामती ॲग्रो कंपनीतील घोटाळ्या प्रकरणात आमदार रोहित पवारांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावून चौकशीसाठी २४ जानेवारी रोजी बोलाविले होते. त्यावेळी राजकीय दबावातून जाणीवपूर्वक अशा चौकशी लावल्या जात आहेत. विरोधकांना त्रास देण्यासाठी हा उद्योग केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाने केला.
पण रोहित पवारांच्या ईडी चौकशीचा शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसने पुरता इव्हेंट केला रोहित पवार शरद पवारांना भेटले शरद पवारांनी त्यांना यशवंतराव चव्हाण यांचे पुस्तक भेट दिले रोहित पवार शरद पवारांच्या आणि त्यांच्या आत्या सुप्रिया सुळे यांच्या पाया पडल्याचे फोटो व्हायरल झाले आणि त्यानंतर रोहित पवार ईडीच्या चौकशी आणि तपासला सामोरे गेले. रोहित पवारांची चौकशी सुरू असताना शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात बसून होते खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ईडीच्या दरवाजापर्यंत रोहित पवारांची सोबत केली आणि त्यांना ईडी कार्यालयाच्या दरवाजात त्या सोडून निघून गेल्या.
याच पॉलिटिकल इव्हेंट च्या मुद्द्यावर अजित पवारांनी काका शरद पवार आणि पुतणे रोहित पवार यांच्यावर शरसंधान साधले.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी बारामती ॲग्रो कंपनीतील घोटाळ्या संदर्भात रोहित पवारांची चौकशी केली. त्याबाबत पत्रकारांनी अजित पवारांना विचारल्यावर ते म्हणाले, ज्या विभागांना चौकशीचे अधिकार आहेत ते चौकशीसाठी बोलवत असतात. मलाही कधी काळी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. ते आपल्याला प्रश्न विचारतात त्याची उत्तरे आपण द्यायची असतात. माझीही 5 तास चौकशी झाली. इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनीही चौकशी केली. आहे. पण मी त्याचा कधी प्रपोगंडा केला नाही. लोक जमवून कधीही त्याचा इव्हेंट केला नाही.
खासदार सुप्रिया सुळे या रोहित पवारांना ईडीच्या दरवाजापर्यंत सोडायला गेल्या होत्या. त्यावर अजित पवार म्हणाले, ‘कोणी काय करावे, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. कोणाला चौकशीला बोलवल्यानंतर कोणी-कोणी कुठे हजर राहावे, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. रोहित पवारांच्या चौकशीची बॅनरबाजी सुरू आहे. तशी बॅनरबाजी त्यांना करू देत. त्याच्यामुळे माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत,’ असाही टोला त्यांनी लगावला.
मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेतून सुटेल
मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने मोर्चा मुंबईत येत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याबाबत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, याबाबत मुख्यमंत्र्यांचे सचिव जरांगे पाटलांशी चर्चा करत आहेत. त्यांच्या माध्यमातून ही चर्चा सुरू आहे. हा प्रश्न सुटावा ही माझी देखील इच्छा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, त्यासाठी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरू आहे, चर्चेतून मार्ग निघत असतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App