विशेष प्रतिनिधी
जामखेड : जामखेडच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना केले. त्याचवेळी त्यांनी रोहित पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.Huge funds came to Jamkhed, but people suffered losses in the name of pulling each other’s legs; Eknath Shinde attacks Rohit Pawar
जामखेड शहरात निधी प्रचंड आला मात्र एकमेकांचे पाय खेचण्याचा नादात, निधी थांबविण्यात आला. त्यामुळे जनतेचे नुकसान झाले, अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. त्याचबरोबर हे चित्र बदलायचे असेल तर परिवर्तन होणे गरजेचे आहे. प्रस्थापितांना घरी पाठवले तरच शहराचा विकास करणे शक्य होईल. त्यासाठी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायल बाफना आणि शिवसेनेच्या इतर सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.
Chandrashekhar Bawankule :चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- 2047 पर्यंत काँग्रेसला सत्ता नाही, काँग्रेस नेत्यांमध्ये परस्पर संवाद कमी, व्हिजनही नाही
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहिण योजना केली, लेक लाडकी लखपती योजना केली, महिलांना एसटी मध्ये ५० टक्के सवलत दिली, मुलींना उच्च शिक्षण मोफत केले. सर्व धर्माच्या महिला भगिनींना या योजनांचे लाभ दिले. महिला भगिनींना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आम्ही केले असल्याचे शिंदे म्हणाले.
जामखेड शहर हे विकासापासून वंचित राहिले आहे, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती आहे. आम्हाला संधी दिल्यास हे चित्र मी बदलून दाखवेन, शहराचा सुनियोजित डीपी प्लान तयार करू, शहराला नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी पाणी पुरवठा योजना करू, मैदाने, उद्याने, रस्ते, ड्रेनेज सगळ्या सेवा नीट करण्यासाठी निधी देऊ, असे याप्रसंगी सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख बापूशेठ टायरवाले, शिवसेनेचे सह- मुख्य प्रवक्ते राजू वाघमारे, प्रवक्त्या प्रा.ज्योती वाघमारे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायल बाफना शिवसेनेचे सर्व उमेदवार तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App