प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. How can news based on Mumbai Police report be defamatory? Mumbai High Court acquitted Shilpa Shetty.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पोर्न व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, मुंबई पोलिसांच्या रिपोर्टवर आधारीत बातम्या या मानहानीकरक कशा असू शकतात? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयानं शिल्पा शेट्टीला विचारला.
तुम्ही एक सेलिब्रिटी आहात लोकांना तुमच्याबद्दल वाचायला आवडतं, म्हणून लिहिलं जातंय. तसंच तुमच्याशी संबंधीत काही घडतंय आणि त्याबद्दल जर लिहिले गेले असेल तर त्यांवर तुम्ही बंधने आणण्याची मागणी कशी काय करू शकता? असा उलट प्रश्नच न्यायालयाने शिल्पा शेट्टीला केला.
दरम्यान या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलेल्या सर्वांना 18 ऑगस्टपर्यंत तर शिल्पा शेट्टीला 26 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी 20 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.
मानहानीकारक वृत्त प्रसिद्ध केल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने केलेली मागणी मान्य करून प्रसिद्धीमाध्यमांना वृत्तांकन करण्यापासून सरसरकट मज्जाव केला तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे, असे मत उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केले. त्याचवेळी माध्यमांचे स्वातंत्र्य एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेच्या अधिकाराशी संतुलित असणे आवश्यक असल्याचेही म्हटले.
पत्रकारिता ही अभिव्यक्तीशी संबंधित आहे. त्यामुळे चागंली आणि वाईट पत्रकारिता कशाला म्हणावे याबाबत न्यायालयालाही मर्यादा आहेत, असेही न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी स्पष्ट केले.पण पत्रकारीता ही विश्वासहार्य आणि जबाबदारीने केली पाहिजे हे ही तितकंच खरं आहे त्यामुळे न्यायालय असे निर्देश देवू शकत नाही', असं सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती गौतम पटेल यांन स्पष्ट केलं.
मानहानीकारक वृत्तांमुळे झालेल्या मानसिक त्रासासाठी शिल्पाने २५ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची तसेच समाजमाध्यमे व संकेतस्थळांनी प्रसिद्धीमाध्यमांतील वृत्तांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली होती. परंतु शिल्पाची ही मागणी धोकादायक असल्याचे न्यायालयाने म्हटले.
आम्ही कोणत्याही न्युज चॅनलवर बंदी घालण्याची मागणी करत नाही, मात्र वार्तांकन करताना वैयक्तिक पातळीवर टिका टिप्पणी नसावी असा युक्तीवाद शिल्पा शेट्टीच्या वतीने करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App