विशेष प्रतिनिधी
मुंबई : अखेर अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना भोवले आहे. पोलिसांना त्यांना कागदावर तरी अटक दाखवावी लागली. 10 हजार रुपयांच्या जामिनावर न्यायालयातुन आव्हाड यांनी सुटका झाली.Housing Minister Jitendra Awhad arrested, released on Rs 10,000 bail
जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती. वर्तनगर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवल्यानंतर त्यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं. दंडाधिकाऱ्यांनी १० हजार रोख आणि एका जामीनाच्या आधारावर जामीन मंजूर केला आहे.
सव्वा वर्षानंतर शेवटी कोर्टाने न्याय दिला. जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्याचे आदेश दिले. ठाणे पोलिसांनी त्यांना अटक केली. अनंत करमुसेला न्याय मिळाला. आता अशा गुंड मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवू नये. आम्ही राज्यपालांकडे जितेंद्र आव्हाड यांची हकालपट्टी करण्याची मागणी करणार आहोत. “, असं किरीट सोमय्या त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
घोडबंदर येथील कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. यानंतर आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी त्यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले. त्या वेळी निवासस्थानी आव्हाड उपस्थित होते.
त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करसुमे यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटकही केली आहे. तर, अनंत करमुसेंविरोधातही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनंत यांच्या पत्नीला पोलिसांनी चौकशीसाठी समजपत्र पाठविले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App