विशेष प्रतिनिधी
नागपूर : नागपुरात औरंगजेब प्रेमींनी घडविलेल्या दंगल आणि हिंसाचाराचा मास्टर माईंड फहीम खान याने अतिक्रमण करून बांधलेल्या तीन मजली घरावर अखेर नागपूर महापालिकेने बुलडोझर चालविला. काही मिनिटांच्या कारवाईत त्याचे तीन मजली घर उद्ध्वस्त केले. फहीम खान आधीच अटकेत असून नागपूर महापालिकेने त्याच्या घरावर दोनच दिवसांपूर्वी नोटीस लावली होती. त्याने सरकारी जमिनी अतिक्रमण करून तीन मजली घर बांधले होते. ते नागपूर महापालिकेने अखेर उद्ध्वस्त केले. Nagpur violence
या अतिक्रमित घरासंदर्भात नागपूर महापालिकेकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर नागपूर महापालिकेने महाराष्ट्र रिजनल अँड डाऊन प्लॅनिंग कलम 53 (1) नुसार चौकशी आणि तपास करून संबंधितांना घर खाली करण्याची 24 तासांची नोटीस दिली. ती मुदत पूर्ण झाल्यानंतर नागपूर महापालिकेने कायद्यानुसार बुलडोझर कारवाई केली अशी माहिती नागपूर महापालिकेचे डेप्युटी इंजिनियर सुनील गजभिये यांनी दिली. बुलडोझर कारवाईच्या वेळी त्या परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
– चुकीच्या कामांवर बुलडोझर चालवू : फडणवीस
नागपूर मध्ये दंगल घडवणाऱ्या सगळ्या आरोपींकडून दंग्यातली नुकसान भरपाई वसूल करू. त्यांनी नुकसान भरपाईचे पैसे भरले नाहीत, तर प्रसंगी त्यांच्या प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करू, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिली होतीच. चुकीचे काम झाले असेल तिथे बुलडोझर चालवू, असेही ते म्हणाले होते. त्यानुसार कायद्याच्या कक्षेत राहून आज फहीम खान याच्या घरावर नागपूर महापालिकेने बुलडोझर चालविला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीला वरिष्ठ सनदी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
#WATCH | Nagpur: "…We had the order to investigate into a complaint. We did a proper investigation. As per Sec 53(1) of the MRTP Act (Maharashtra Regional and Town Planning Act, 1966) a notice was issued for 24 hours. As soon as the duration completed, this action was… https://t.co/9eEE1GJsAm pic.twitter.com/6edPdYfegh — ANI (@ANI) March 24, 2025
#WATCH | Nagpur: "…We had the order to investigate into a complaint. We did a proper investigation. As per Sec 53(1) of the MRTP Act (Maharashtra Regional and Town Planning Act, 1966) a notice was issued for 24 hours. As soon as the duration completed, this action was… https://t.co/9eEE1GJsAm pic.twitter.com/6edPdYfegh
— ANI (@ANI) March 24, 2025
– देवेंद्र फडणवीस म्हणाले :
नागपूर मध्ये दंगा घडविणाऱ्या कुठल्याही आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा केल्याशिवाय सरकार सोडणार नाही. नागपूर मधल्या दंग्यात झालेले नुकसान दंगेखोरांकडून वसूल करू. त्यांनी नुकसान भरपाईचे पैसे दिले नाहीत तर दंगेखोरांच्या प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाईचे पैसे वसूल करून घेऊ. जिथे चुकीचे काम झाले असेल, तिथे बुलडोझर देखील चालवू.
आतापर्यंत पोलिसांनी 104 आरोपींना अटक केली आहे. अजूनही तपास आणि सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण सुरू आहे. आणखी काही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात लवकरच येणार आहेत. आरोपीचे बाहेरच्या देशातले कुठले कनेक्शन अद्याप सापडलेले नाही, पण त्याचे मालेगाव कनेक्शन सापडले आहे.
दंगेखोरांनी अफवा पसरवून आणि प्लॅनिंग करूनच दंगे घडविले हे तपास आणि चौकशीत उघड झाले आहे. दंगे भडकविणाऱ्या सोशल मीडियाच्या 64 पोस्ट आयडेंटिफाय होऊन त्या डिलीट झाल्या आहेत. सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्यांना सहआरोपी करून कायद्यानुसार कठोरातली कठोर शिक्षा करू.
राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवणारा कुठल्याही जातीचा अथवा धर्माचा असेल तरी त्याला सरकार सोडणार नाही. काँग्रेसने नागपूर दंगलीचे सत्य तपासण्यासाठी नेमलेल्या समितीत अकोला दंगलीचा मुख्य आरोपी आहे. हा काँग्रेसचा अल्पसंख्याकांचे पाय चाटण्याचा प्रकार आहे.
पोलिसांनी नागपूरची दंगल चार ते पाच तासांमध्ये आटोक्यात आणली. त्या दंगलीचा नागपूर मधल्या 80 % भागावर काही परिणाम झाला नव्हता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आगामी नागपूर दौरा निर्वेधपणे पार पडेल. त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App