Bawankule : हनी ट्रॅप, पेनड्राइव्ह या सर्व शिळ्या भाकरी; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांना टोला

Bawankule

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Bawankule भाजप नेते तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हनी ट्रॅपच्या मुद्यावरून सरकारवर चौफेर टीका करणाऱ्या विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. हनी ट्रॅप व पेन ड्राईव्ह या सर्व शिळ्या भाकरी आहेत. विरोधक मीडियातील आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वाढवून, चढवून बोलतात, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांना आपली उंची पाहून बोलण्याचाही उपरोधिक सल्ला दिला. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरही निशाणा साधला.Bawankule

चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची सर्व दुकाने बंद केली आहेत. यामुळे संजय राऊत यांचा त्यांच्यावर राग आहे. त्यांनी बोलणे बंद केले असे तर उद्धव ठाकरे यांच्या काही जागा वाढल्या असत्या. त्यांच्या अनावश्यक बोलण्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या जागा कमी झाल्या. मोदींना आता 2029 पर्यंत जनमत मिळाले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनीच आता कुणाला नेता मानायचे हे ठरवावे. त्यांना भाजप व आमच्या राष्ट्रीय नेत्यांत लुडबूड करण्याचा अधिकार नाही. मोदी समर्थ आहेत. सक्षम आहेत. त्यांना केव्हा निवृत्ती घ्यायची हे कळते. यापूर्वी अनेक नेत्यांनी वयाच्या 80 ते 82 व्या वर्षापर्यंत काम केले आहे.



हनी ट्रॅप, पेनड्राईव्ह शिळ्या भाकरी

चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हनी ट्रॅपविषयी केलेले आरोपही फेटाळून लावले. ते म्हणाले, हनी ट्रॅप व पेनड्राईव्ह या सर्व शिळ्या भाकरी आहेत. मीडियातील स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी विरोधक वाढवून चढवून बोलतात. त्यांचे आरोप 5 वर्षे जुने आहेत. सध्या 2025 सुरू आहे. विरोधकांकडे दुसरे कोणतेही मुद्दे नाहीत. महाविकास आघाडीत प्रचंड वाद आहेत. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सुद्धा त्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला होती. त्यांना एकत्र पत्रकार परिषद घेता आली असती, पण ते त्यावेळीही एकत्र दिसले नाहीत. विरोधकांत कोणताही समन्वय नाही. त्यानंतरही ते विरोधी पक्षनेता निवडण्याची मागणी आहे. ते आपसातच भांडत आहेत.

उंची पाहून बोला, खडसेंना टोला

चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना स्वतःची उंची पाहून बोलण्याचा उपरोधिक सल्ला दिला. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर वैयक्तिक आरोप करून त्यांच्या जीवनाविषयी संशय निर्माण करणे योग्य नाही. एकनाथ खडसे यांनी वैयक्तिक हेवेदावे व राजकारण सोडावे. प्रफुल्ल लोढा यांचे फोटे सर्वच पक्षांतील नेत्यांसोबत आहेत. त्यामुळे कुणी शेजारी उभे राहून फोटो काढला म्हणून कुणी दोषी होत नाही. त्यामुळे खडसे यांनी स्वतःची उंची पाहून आरोप केले पाहिजेत, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Bawankule Slams Opposition: Honeytrap, Pendrive ‘Stale Bread’

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात