विशेष प्रतिनिधी
पुणे : थोरल्या बाजीरावांच्या पराक्रमाचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पण माझ्या जीवनात जेव्हा केव्हा नैराश्याची दस्तक येते, तेव्हा मला नेहमी बाल शिवाजी आणि श्रीमंत बाजीरावांचा विचार येतो आणि निराशा कोसो दूर जाते. एवढ्या विपरीत स्थितीत ते केलं, तर आता सर्वत्र अनुकूलताच अनुकूलता आहे, असं अमित शाह यांनी सांगितलं.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे अनावरण अमित शाह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
पूर्ण दक्षिण भारत मोगलांमुळे पीडित होता. उत्तर मुगलांच्या आधीन होता. त्यावेळी 12 वर्षाच्या मुलाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा अकल्पनीय पराक्रम होता. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचीच केवळ स्थापना केली नाही. तर राज्यभरातील तरुणांच्या मनात स्वराज्याची कल्पना रुजवली. त्यांच्यानंतर संभाजी महाराज, ताराबाई, धनाजी संताजी यांनी शिवाजी महाराजांची परंपरा पुढे नेली” असं अमित शाह म्हणाले. “स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. पण जेव्हा शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून आले. तेव्हा मराठी साम्राज्याचे दोन तुकडे झालेले. तेव्हा बाळाजी विश्वनाथ त्यानंतर श्रीमंत बाजीरावांनी पेशवा बनून शिवाजी महाराजांची मशाल पुढे नेली. 10 वर्षातच तंजावूर पासून कटकपर्यंत विराट हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. ही स्वातंत्र्याची लढाई शिवाजी महाराजांनी सुरू केली. पेशव्यांनी 100 वर्ष चालवली. ती लढली नसती तर आज भारताचं मूळ स्वरुप राहिलं नसते, असे अमित शाह म्हणाले.
आपली चपळाई आणि रणनीती तसेच वीर साथीदारांच्या सोबत बाजीराव पेशव्यांनी अनेक हरलेली युद्ध जिंकली. पालखेडचा विजय काळजीपूर्वक वाचला तर निजामाच्या विरोधातील हा विजय अकल्पनीय होता. अनेक युद्ध कौशल्याचे अभ्यासू देश आणि विदेशातील सेनानींनी त्यांच्या युद्ध कौशल्यावर बरंच सांगितलं आहे. पण बुंदेलखंड, गुजरात, तंजावूर, मध्यप्रदेशापर्यंत या सर्व स्थानापासून स्वराज्याची ज्योत पेटवल्यानंतर धारमध्ये पवार, बडोद्यात गायकवाड अनेक ठिकाणी चिमणाजींचं सहकार्य घेऊन प्रशासन स्थापन केलं. दीर्घकाळ स्वातंत्र्याची ज्योत पेटत राहील असं काम त्यांनी केलं” असं अमित शाह म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App