विशेष प्रतिनिधी
पुणे : हिंदू धर्मामध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण माझा रंभाला आजपासून सुरुवात होत आहे. वर्षभरातून एकदा येणारा श्रावणमास हा प्रत्येक हिंदू धर्मियांसाठी अतिशय महत्त्वाचा महिना समजला जातो. या महिन्यांमध्ये हिंदू बांधव अनेक प्रकारची व्रत वैकल्य, उपास या सगळ्या गोष्टी ते करत असतात. या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. Holi Shravan month starting
यंदा श्रावणमास सुरू व्हायला एक महिना उशीर झाला असून, 17 ऑगस्ट पासून 15 सप्टेंबर या दरम्यान श्रावण महिना असणार आहे. यामध्ये २१ ऑगस्ट, २८ ऑगस्ट, ४ सप्टेंबर आणि ११ सप्टेंबर असे चार श्रावण सोमवार आहेत. श्रावणातील पहिल्याच सोमवारी म्हणजे २१ तारखेला नागपंचमीचा सण आला आहे. ३० ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आहे.
सहा आणि सात सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला असे दोन सण आहेत. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा असणार पोळा हा सण १४ तारखेला साजरा केला जाणार आहे. श्रावण मासातील सोमवारी शहरातील महादेव मंदिरामध्ये भाविक दर्शनासाठी गर्दी करतात, त्यादृष्टीनेही तयारी केली जात आहे. तसेच दहीहंडीसाठी मंडळांची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी भाद्रपद महिना प्रारंभ होणार आहे. नागपंचमी हा सण पहिल्याच सोमवारी आला आहे. श्रावण महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असणार आहे. अधिक मासामुळे गेले महिनाभर अनेक मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सण आणि उत्सवांमुळे अर्थचक्रालाही चालना मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App