सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणातील आरोपी मॉडेल रिया चक्रवर्तीला न्यायालयाचा दिलासा

विशेष प्रतिनिधी

मुंबई – अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या मॉडेल रिया चक्रवर्तीला विशेष न्यायालयाने दिलासा दिला. रियाला तिची बँक खाती आणि ठेवी खुली करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच एनसीबीने जप्त केलेला तिचा लॅपटॉप आणि फोन एक लाख रुपयांच्या हमीपत्रावर परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.High court gave relief to Riya chakravarti

रियाने न्यायालयात हमीपत्र दाखल केल्यानंतर एनसीबीने संबंधित बँकांना याबाबत पत्र द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले. सुशांतसिंगला अमली पदार्थ पुरविल्याच्या आरोपात रिया आणि तिचा भाऊ शौविकला एनसीबीने अटक केली होती. उच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला आहे. रियाची बँक खाती खुली करण्याबाबत एनसीबीने ठाम विरोध केला नाही. त्यामुळे ती खुली करण्याचे आदेश देत आहे, असे निरीक्षण विशेष न्या. डी. बी. माने यांनी नोंदविले आहे.

मागील दहा महिन्यांपासून माझी बँक खाती सील आहेत. मला माझ्या कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा आहे आणि काही कर भरायचे आहेत. तसेच माझा आणि माझ्या भावाचा खर्च माझ्यावर अवंलबून आहे. त्यामुळे माझी बँक खाती खुली करावी, अशी मागणी तिने केली होती.

High court gave relief to Riya chakravarti

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात