विशेष प्रतिनिधी
ग्वाल्हेर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ग्वाल्हेर मध्ये पोहोचली. तिथून त्यांनी इकडे लोक उपाशी तिकडे अंबानींच्या लग्नात सेलिब्रिटींचे फोटो सेशन असे म्हणत निशाणा साधला. पण त्यामुळे राहुल गांधींनी आदित्य आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो पाहिला की काय??, अशी चर्चा सोशल मीडियात सुरू झाली. Here people are starving, there is a photo session at Ambani’s wedding
राहुल गांधी म्हणाले की, अंबानींच्या कुटुंबात लग्न चालू आहे. तिथे लोक सेल्फी काढत आहेत आणि इथे लोक उपाशी मरत आहेत. जगभरातले दिग्गज लोक अंबानींच्या कार्यक्रमासाठी दाखल झालेले आहेत. गुजरातच्या जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची प्री-वेडिंग सेरेमनी सुरु आहे. यात दोन दिवसांपूर्वी रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील सामील झाले होते. आदित्य ठाकरेंनी झगमगित कुडता घालून फोटोशूट देखील करून घेतले, पण तो कुडता नेमका लेडीज कुर्ती वेअर सारखा असल्याचे आढळले. त्यामुळे सोशल मीडियात आदित्य ठाकरे प्रचंड ट्रोल झाले.
राहुल गांधींनी अंबानींच्या लग्नाच्या फोटो सेशन वर टीका केल्यामुळे त्यांनी आता आदित्य ठाकरेंचा आदित्य ठाकरे यांचे फोटोशूट पाहिले की काय??, असा खोचक सवाल लागेल आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून केला.
#WATCH | Gwalior, Madhya Pradesh: During the Bharat Jodo Nyay Yatra, Congress MP Rahul Gandhi says, "Today, there is maximum unemployment in the country in the last 40 years. India has double the unemployment as compared to Pakistan. We have more unemployed youth than Bangladesh… pic.twitter.com/friZnVtHA0 — ANI (@ANI) March 3, 2024
#WATCH | Gwalior, Madhya Pradesh: During the Bharat Jodo Nyay Yatra, Congress MP Rahul Gandhi says, "Today, there is maximum unemployment in the country in the last 40 years. India has double the unemployment as compared to Pakistan. We have more unemployed youth than Bangladesh… pic.twitter.com/friZnVtHA0
— ANI (@ANI) March 3, 2024
ग्वाल्हेर येथे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, सध्या मी जे बोलतोय ते कुणीही दाखवणार नाही. टीव्हीवर फक्त अंबानी यांच्या मुलाचा शाही विवाह दाखवला जातोय. तिथे लग्नाची धुमधाम सुरु आहे. जगभरातील लोक येत आहेत.. सेल्फी घेतल्या जात आहेत.. आणि तुम्ही इथे उपाशी मरत आहात.
राहुल गांधींनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरलं. राहुल म्हणाले की, भारत जोडो यात्रेनंतर आम्ही भारत जोडो न्याय यात्रा सुरु केली आहे. या यात्रेमध्ये आम्ही न्याय हा शब्द जोडला आहे. त्याचं कारण देशामध्ये जो द्वेष पसरत चालला आहे त्याचं कारण अन्याय आहे. सध्या देशात ४० वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी वाढल्याचं दिसून येतंय. त्याचं कारण केंद्र सरकार असून मोदींनी जीएसटी लावली आणि नोटबंदी केली. त्यामुळे देशातल्या लोकांचे रोजगार गेले आहेत.
ग्वाल्हेर येथे राहुल गांधींनी पुन्हा एकदा जातनिहाय जनगणनेची मागणी केली. ते म्हणाले की, देशात साधारण 50 % ओबीसी, 15 % दलित आणि 8 % आदिवासी वर्गातील लोक आहेत. म्हणजे 73 % लोक. देशातल्या मोठमोठ्या कंपन्यांमधील मॅनेजमेंटमध्ये एकही ओबीसी, दलित किंवा आदिवासी तुम्हाला दिसणार नाही. आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी केली तर मोदी म्हणतात- देशात केवळ दोन जाती आहेत.. गरीब आणि श्रीमंत. देशातल्या 73 % लोकांना संधी मिळावी, असे त्यांना वाटतच नाही. असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App