अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच थेट मदत!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असताना अतिवृष्टी मध्ये प्रचंड नुकसान झाले परंतु शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार तत्पर असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट मदत देण्यात येईल, अशी खात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली‌ Devendra Fadnavis

सध्या राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बीड, मराठवाडा, अहिल्यानगर यांसह अनेक भागांना मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक अडकले आहेत. सध्या प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरु आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पूरस्थितीची सविस्तर माहिती घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात कुठे अतिवृष्टी झाली आहे, कुठे पूर आला आहे, कोणत्या भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे, याबद्दलचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी या भागात अतिवृष्टी झाली आहे. जवळपास यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती दिली.



देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सध्या इतका पाऊस पडलाय जो सरासरीच्या 102 % इतका आहे. काही भागत पूरस्थितीमुळे लोक अडकले आहेत. बीडमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. धाराशिवमध्येही रेस्क्यू ऑपरेशन सुरु असून 27 लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने एनडीआरएफने बाहेर काढलं. 200 लोकांना अजून वेगवेगळ्या सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे. सध्या आमच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्री हे तिथे पोहोचले आहेत. त्यांनी अतिरिक्त हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. त्याबद्दलही सध्या मी प्रयत्न करत आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

विशेषत अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी या भागात अतिवृष्टी झाली आहे. जवळपास यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले आहेत. आता एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १७ तुकड्या या त्या ठिकाणी काम करत आहेत. काही आठवड्यांपूर्वी आपण शेतकऱ्यांचे जे नुकसान झालं, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यावेळी आपण जसे पंचनामे येतील, तशी मदत केली जाणार आहे. आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटींची मदत करण्याचे जीआर काढलेले आहेत, असेही फडणवीसांनी म्हटले.

पूरग्रस्त भागांना भेटी द्या

यातील 1829 १८कोटी हे जिल्ह्यात जमाही झालेले आहेत. यानंतर पुढच्या ८ ते १० दिवसात हे पैसे आम्ही जमा करणार आहोत. हे सर्व पैसे जमा होतीलच, त्यासोबत अद्यापही या ठिकाणी काम थांबलेलं नाही. नवनवीन ठिकाणी पाऊस पडतोय. त्या ठिकाणी पंचनामे करणं आणि मदत करणे हे काम सातत्याने सुरु राहणार आहे. त्यामुळे एखाद्या जिल्ह्यात काम सुरु आहे. ते काय थांबलेलं नाही. आता एका तालुक्याचे रिपोर्ट आले तर त्यांना मदत करुन टाकायची, असे धोरण ठेवलं आहे. जेणेकरुन तातडीची मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. तसेच ज्या ठिकाणी मृत्यू झाला असेल त्यांना मदत करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. तसेच ज्यांचे पुरामुळे नुकसान झालं अशा लोकांनाही मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. आज मंत्रिमंडळात याचा आढावा घेण्यात आला आहे. कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेतला आहे. उद्या पालकमंत्र्यांना किंवा मंत्र्‍यांना या पूरग्रस्त भागात त्यांनी भेटी द्यायच्या आहेत, अशी सूचना केली आहे. मी देखील काही भागांमध्ये जाणार आहे, अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

Heavy rains cause huge losses, government ready to help farmers ; Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात