सत्तांतराच्या नाटयात मिम्सचा जोरदार पाऊस; सर्वपक्षीय नेत्यांना नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या

विशेष प्रतिनिधी

पुणे : काल रविवारची दुपार महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतराचा नवा अंक घेऊन आली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का देत शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हूणन शपथ घेतली आणि समाज माध्यमावर मिम्सचा जोरदार पाऊस पडला. Heavy rain of Mims in the drama of power transfer

रविवारची दुपार,बाहेर पावसाळी मस्त हवा,आणि टीव्ही समोर सुरू असलेला मोठा राजकीय इव्हेंट आणि सोबतीला फक्कड असे खाण्याचे बेत आखत नेटकऱ्यांनी या सत्तानाट्याची पुरेपूर मजा लुटली .
यापैकी काही व्हायरल झालेले लोकप्रिय मिम्स

1 निवडणूक आयोगाला नम्र विनंती यापुढे मतदान केल्यावर आमच्या बोटाला शाही ऐवजी चुना लावा .

2 किरीट भाई सोमय्यांकडे रद्दी पेपर खरेदी करण्यासाठी भंगारवाले रद्दी पेपर वाले यांची झुंबड.

3. फडणवीस आणि अजित दादा यांचा निषेध.
पहाटेची झोप मोडलेली परवडली पण रविवारीदुपारचे जागरण नको होतं.
एक पुणेकर.

4. आता मात्र राजकारणाचा अगदी चांदणी चौक झाला आहे. एका पुणे कराची प्रतिक्रिया

5. आता नवीन पुस्तक येणार लोक माझे पांगती..

6. तूप बाहेर काढण्याच्या पाच पद्धती
1 अटल बिहारी वाजपेयी – सरळ बोटाने.
2 नरेंद्र मोदी – बोट वाकडं करून.
3. अमित शहा – डबा उलटा करून
4. योग्य आदित्यनाथ -डबा गॅसवर गरम करून
5. देवेंद्र फडणवीस – डब्याच्या तळाला भोक पाडून

राष्ट्रवादी देवेंद्र वासी झाली.

सर्व मराठी बाबांसाठी टीव्हीवर महाएपिसोड .

एकदा मतदान केलं आणि तीनं मुख्यमंत्री चार उपमुख्यमंत्री मिळाले.

पावसाळी सेलचा फील येतोय .

Heavy rain of Mims in the drama of power transfer

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात