आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यात आली.Havasa Heritage building in Kandivali catches fire in Mumbai; Two killed, Mayor Kishori Pednekar admitted to the spot
विशेष प्रतिनिधी
मुम्बई : मुंबईतील कांदिवली येथे हवासा हेरिटेज नावाच्या १५ मजल्याच्या इमारतीत १४ व्या मजल्यावर भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यात आली. या आगीत सुमारे ७ जण अडकले होते, सध्या दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी येत आहे.
रात्री आठच्या सुमारास आग लागली होती, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या ८ गाड्यांच्या मदतीने २ तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात आली. घटनास्थळी पोहोचत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. आग लागली तेव्हा काही लोक आत अडकले होते, त्यापैकी काही जखमी झाले आणि दोन जणांचा मृत्यू झाला. कांदिवलीतील आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला, एक ८९ वर्षांची आहे, तर दुसरी ४५ वर्षांची महिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App